Wednesday, July 15, 2026
Homeमुंबईअखेर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे बिगुल वाजले..

अखेर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे बिगुल वाजले..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

मुंबई :-जस-जशी निवडणुकांची तारीख जवळ येऊ लागली,तस-तशी अनेकांची पोस्टर बाजी सुरू झाल्याचे चित्र शहरी तसेच ग्रामीण भागात दिसून येत आहेत.पाच वर्षे बिळात काढायचे अन् सहाव्या वर्षी सक्रिय असल्याचे जनतेला भासावयाचे,अशी अनेकांची खेळी सुरू झाली आहे.त्यातच जनता- जनार्दन पैश्याच्या लोभापायी जनतेची कामे न करणाऱ्या लखपतींना आणखी करोडपती बनवत आहेत.दोनशे,पाचशे,हजार रुपये एकदाच घेतात अन् विकत घेतल्यासारखे गप्प बसून राहतात.खरी पारख करण्यासाठी सध्याच्या घडीला कुणाकडेही वेळ नसल्याने केवळ पैसा म्हणून खटबावल्यांना निवडून देतात.अश्यातच आता राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजल्याने पुढील काळात मतदारांची हालचाल,आक्षेप नोंदणी आणि अंतिम यादी प्रसिद्धी या सगळ्या घडामोडींमुळे ग्रामीण महाराष्ट्राचे राजकारण अधिक रंगतदार ठरणार आहे.राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी काल मंगळवारी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.या कार्यक्रमानुसार,काही जिल्हे वगळता राज्यातील ३२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायत समिती यांचा समावेश असलेल्या निवडणुकांसाठी १ जुलै २०२५ हा अधिसूचित दिनांक निश्चित करण्यात आला आहे.त्या दिवशी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी हाच निवडणुकांसाठी आधार म्हणून वापरण्यात येणार आहे. याचा अर्थ असा की,विधानसभेच्या मतदार यादीत ज्या व्यक्तींची नावे आहेत,त्यांची नावे या निवडणुकांसाठी यादीत समाविष्ट केली जातील.जिल्हा परिषद निवडणूक विभाग आणि पंचायत समिती निवडणूक विभागाकडून ८ ऑक्टोंबर २०२५ रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल.या यांदींवर ८ ते १४ ऑक्टोंबर २०२५ पर्यंत हरकती आणि सूचना दाखल करता येईल.यात मतदारांचा चुकीच्या विभागात समावेश होणे,पत्ता चुकीचा टाकला जाणे किंवा विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत न आढळणे अशा त्रुटींबाबत नागरिक आक्षेप नोंदवू शकतील. यादरम्यान,निवडणूक आयोगाने स्पष्ट केले की,या प्रक्रियेत नवीन मतदारांची नावे समाविष्ट करणे,नावे वगळणे किंवा मोठ्या प्रमाणावर दुरुस्ती करणे असे बदल करण्यात येणार नाहीत.याचे कारण म्हणजे,या निवडणुकांसाठी विधानसभेच्या यादींना मूळ मानले जाते.मात्र,प्रारुप यादींमध्ये तांत्रिक किंवा लेखनिक चुकांची दुरुस्ती केली जाणार आहे.२७ ऑक्टोंबर २०२५ रोजी अंतिम मतदार यादी आणि मतदान केंद्रनिहाय यादी जाहीर होईल.या अंतिम यादीवरच जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडतील.त्यामुळे येत्या डिसेंबर महिन्यात निवडणुका होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.या प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगूल वाजल्याचे स्पष्ट झाले आहे.गाव पातळीपासून ते अगदी जिल्हा पातळीपर्यंत राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून विविध पक्षांनी आपल्या रणनीतींचे नियोजन करण्यास सुरुवात केली आहे.ग्रामीण भागात या निवडणुकांना मोठे महत्त्व आहे.कारण जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या संस्था थेट लोकांच्या विकासकामांशी संबंधित असतात.शिक्षण,आरोग्य,रस्ते, पाणीपुरवठा यांसारख्या सुविधा पुरवण्यात या संस्थांची भूमिका महत्त्वाची आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता राज्यभरातील धनादेश अनादराची प्रकरणे परस्पर सामंजस्याने निघणार निकाली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशान्वये निगोशिएबल इन्स्ट्रुमेन्ट्स ॲक्ट,१८८१ च्या...

आजपासून संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ च्या कलम ३७ (१) व (३)अन्वये संपूर्ण गडचिरोली...

महत्त्वपूर्ण निर्णय..चंद्रपूर डाक विभागातून विभाजन होऊन आता गडचिरोली स्वतंत्र डाक विभाग..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत डाक विभागाने चंद्रपूर डाक विभागातून गडचिरोली डाक विभागाचे प्रशासकीय विभाजन करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.या...

पदाचा दुरुपयोग; चार लाखाची झाडे विकली एक लाखात,सरपंच अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काहीजण एखाद्या पदावर विराजमान झाले की,स्वतःला मोठे पदाधिकारी समजून मनमर्जीने निर्णय घेण्याचा सपाटा चालवतांना दिसून येतात.पण,आपल्या मागची पार्श्वभूमी काय होती आणि...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!