Wednesday, June 10, 2026
Homeगडचिरोलीउपक्रमशील शिक्षक लक्ष्मण रत्नम 'विनोबा भावे' पुरस्काराने सन्मानित..

उपक्रमशील शिक्षक लक्ष्मण रत्नम ‘विनोबा भावे’ पुरस्काराने सन्मानित..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्हा परिषद गडचिरोली व ओपन लिंक्स फाउंडेशन यांच्या सामंजस्य करारातून राबविण्यात येणाऱ्या ‘आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्यक कार्यक्रम’ अर्थात विनोबा (बा)ॲपच्या माध्यमातून जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षकांचा दरमहा सन्मान केला जातो.माहे ऑगस्ट २०२५ मध्ये मुलचेरा तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येल्ला येथील उपक्रमशील शिक्षक लक्ष्मण रत्नम हे ‘पोस्ट ऑफ दि मंथ’ विजेते ठरले असून आज,बुधवार २४ सप्टेंबर २०२५ रोजी त्यांना मानाचा ‘विनोबा भावे पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले.शिक्षक लक्ष्मण रत्नम हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्तावाढीसाठी सतत प्रयत्नशील असतात.विविध खेळ,नाविन्यपूर्ण उपक्रम आणि आनंददायी अध्यापन पद्धतीच्या माध्यमातून ते शैक्षणिक क्षेत्रात आजपर्यंत नवनवे प्रयोग घडवत आले आहेत.त्यामुळेच त्यांच्या कार्याची दखल घेत हा पुरस्कार त्यांना मिळाला. सदरचा पुरस्कार मुलचेरा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी धनंजय कांबळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.याप्रसंगी विनोबा भावे कार्यक्रमाचे जिल्हा समन्वयक चंदन रापर्तीवार आणि वि.सा.व्य. अमर पालारपवार उपस्थित होते.सदर पुरस्कार स्वीकारतांना शिक्षक लक्ष्मण रत्नम म्हणाले, “विनोबा भावे पुरस्कार मिळाल्याने माझ्या कार्याची पावती मला मिळाली आहे.यापुढेही विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी अधिक जोमाने प्रयत्न करत राहीन.”
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दुर्गम गडचिरोलीतील तब्बल ७८ विद्यार्थ्यांना देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुर्गम,नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात आलेला ‘मिशन-२००’ हा उपक्रम...

अखेर नदीत बुडालेल्या तीन तरुणांचे सापडले मृतदेह; उर्वरित दोन युवकांचा शोध सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या घुग्गुस शहरातील पाच तरुण म्हातारदेवी परिसरातील वर्धा नदीवर पोहण्यासाठी गेले असता काल सोमवारच्या रात्री उशिरापर्यंत घरी परतले नसल्याने नदीत बुडाल्याची भीती...

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना झटका.. आता नऊ सिलेंडरवर नाही; तर चारच सिलेंडरवर मिळणार अनुदान..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दरात रविवार ७ जून २०२६ पासून २९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.त्यानुसार, बऱ्याचश्या जिल्ह्यांमध्ये गॅस सिलेंडरच्या किंमतींनी...

कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी आधार पडताळणी करणे आवश्यक..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील अनेक शेतकरी गेल्या काही वर्षापासून नैसर्गिक आपत्ती,अवकाळी पाऊस, उत्पादन खर्चातील वाढ आणि शेतमालाला न मिळणारा योग्य भाव,यामुळे आर्थिक संकटाचा सामना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!