उद्रेक न्युज वृत्त
कुरुड :- देसाईगंज तालुक्यातील कुरुड ग्रामपंचायत येथे आज १७ फेब्रुवारी रोजी विशेष ग्रामसभा बोलावून रोजगार सेवकाची निवड करण्यात आली.
विशेष ग्रामसभेचे अध्यक्ष म्हणून ग्रामपंचायतीचे सदस्य अविनाश गेडाम यांची नियुक्ती करण्यात आली होती.रोजगार सेवकाची नियुक्ती करेतेवेळी मतदान पद्धतीने निवड करण्यात आली.रोजगार सेवकाच्या निवडिकरिता गावातील सहा जणांनी अर्ज केला होता. ग्राम रोजगार सेवक म्हणून प्रमोद झुरे यांची निवड करण्यात आली. तर इतर अन्य पांच अर्ज केलेल्या उमेदवारांना मजूर मित्र म्हणून निवड करण्यात आली.

ग्रामसभे प्रसंगी ग्रामपंचायत सरपंचा प्रशाला अविनाश गेडाम, ग्रामपंचायत सदस्य, ,ग्रामपंचायत सदस्य शंकर पारधी,पटूलदास मडावी,रेखा मडावी,आशाताई मिसार,माजी जिल्हा परिषद सदस्य दिगांबर मेश्राम विठ्ठल ढोरे, मनोज ढोरे पोलीस दक्षता पीपल्स,विलास गोटेफोडे,प्रतिष्ठित नागरिक व समस्त ग्रामवासीय जनता उपस्थित होते.