उद्रेक न्युज वृत्त
कुरूड :- देसाईगंज तालुक्यातील सर्वात मोठे गाव असलेल्या कुरुड गावातील शंकरपट व मंडई काही दिवसांपासून हो नाही..! हो च्या..भोवऱ्यात सापडली होती.गावातील काही जनता शंकरपट करायची तर काही जनता नाही करायची; अशा स्थितीत असल्याने सर्वत्र संभ्रम निर्माण झाले होते.अशातच आज ९ फेब्रुवारी ला सकाळ पासूनच बाहेर ठिकाणाहून येणाऱ्या दुकानांची रेलचेल सुरू झाली असल्याने गावामधे मंडई भरण्यास सुरुवात झाली आहे.
मंडई भरण्यास सुरवात तर झाली; मात्र गावामधे केवळ दोनच नाटकांचे सादरीकरण होणार असल्याने बाहेर ठिकाणाहून येणाऱ्या नाटक शौकिनांची हिरमोड होणार असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.पूर्वी गावामधे १२ ते १३ नाटकांचे सादरीकरण व्हायचे.मात्र हो नाही च्या नादात बग्यांची गर्दी वाढणार की कमी असणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहेत.