Friday, July 31, 2026
Homeमुंबई७५ शाळांना अल्पसंख्यांक दर्जा देण्याचा वादग्रस्त निर्णय; मुख्यमंत्री ॲक्शन मोडवर..

७५ शाळांना अल्पसंख्यांक दर्जा देण्याचा वादग्रस्त निर्णय; मुख्यमंत्री ॲक्शन मोडवर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर काही तासांतच जवळपास २० संस्थांच्या ७५ शाळांना अल्पसंख्यांक दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने सदरचा निर्णय हा वादग्रस्त ठरला असून या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाला स्थगिती देत प्रकरणाची चौकशी करण्याचे फर्मान सोडले आहे.विशेष म्हणजे,राज्यात तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आलेला असतांनाच हे कारस्थान करण्यात आल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या कार्यकाळात अल्पसंख्यांक दर्जा देण्याच्या फाईल्सना स्थगिती देण्यात आली होती.नंतर हे खाते अजित पवारांकडे गेले.प्रकरण प्रलंबित असतांनाच अजित पवारांच्या दुर्दैवी मृत्यूच्या दिवशीच काही तासांच्या आतच ही प्रमाणपत्रे देण्यात आली.अजित पवारांच्या निधनाच्या दिवशीच तब्बल सहा शाळांना हे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.अजित पवारांच्या निधनाचा शोक संपूर्ण राज्यात निर्माण झाला होता.हे खातेही त्यांच्याकडे होते.नेमक्या त्याच दिवशी हे प्रमाणपत्र देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करून या प्रकरणातील अधिकारी किती तत्पर व निष्ठावंत असल्याचे दिसून येत आहे.सदरची बाब उघडकीस आल्यानंतर राज्य अल्पसंख्याक आयोगानेही नाराजी व्यक्त केली आहे.आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी या प्रकरणाची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेऊन तात्काळ कारवाई करावी,अशी मागणीही केली आहे. प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस अक्षय जैन यांनी देखील या प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी कारवाई करावी,अशी मागणी केली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून त्यांनी या प्रकरणाला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जिल्हा परिषदांसह मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बार एकाचवेळी होण्याची शक्यता..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील ५० टक्के ओबीसी आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या तब्बल २२ जिल्हा परिषदांच्या निवडणूका अद्यापही रखडल्या आहेत.विशेष म्हणजे,ज्या ठिकाणी मर्यादा ओलांडल्या गेल्या...

बांधकाम कामगारांनो सावधान..! योजनांच्या नावाखाली कुणालाही पैसे देऊ नका- न्यू ह्यूमन राईट अँड फाईट रिसर्च फाउंडेशनचे आवाहन

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांच्या नावाखाली काही ठिकाणी एजंट,दलाल,मध्यस्थ किंवा इतर व्यक्तींमार्फत बांधकाम...

पुराचा तडाखा; तब्बल ७०० नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टी व पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा प्रशासनाशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला.यावेळी जिल्हाधिकारी...

रेल्वेच्या धडकेत दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-रेल्वेच्या धडकेत दोन सख्ख्या भावांचा  दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागपूर जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील मालेगाव टाऊन परिसरात आज,गुरुवार ३० जुलै रोजी सकाळच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!