Friday, July 31, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तसोन्याचे दर एक लाखाच्या खाली येण्याची शक्यता..!

सोन्याचे दर एक लाखाच्या खाली येण्याची शक्यता..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-सोने-चांदीच्या दराने उच्चांकी गाठल्यानंतर हळूहळू घसरण म्हणजेच दर कमी होऊ लागल्याचे चित्र आहे.यामुळे पुढील काळात सोन्याच्या दरात मोठी घसरण होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.जानेवारी २०२६ मध्ये एमसीएक्सवर सोन्याचा दर १ लाख ८० हजार ७७९ प्रति १० ग्रॅमचा ऐतिहासिक उच्चांक गाठल्यानंतर, फेब्रुवारी २०२६ मध्ये सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे.१३ फेब्रुवारीला सोन्याचा भाव १ लाख ५६ हजार २०० पर्यंत खाली आला,जो विक्रमी उच्चांकापेक्षा सुमारे २४ हजार ५०० रुपये कमी आहे.काल सोमवारी एमसीएक्सवर सोने ०.६१ टक्के घसरून १ लाख ५४ हजार ९३७ रुपये प्रति १० ग्रॅमवर आले.काही तज्ज्ञांच्या मते भारतात सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम एक लाख रुपयांपेक्षा खाली येण्याची शक्यता आहे.विशेष बाब म्हणजे,सोन्याच्या दरात वारंवार चढउतार होत असल्याने खरेदीदारांमध्ये फारसा उत्साह नाही.अमित गोयल यांच्या मतानुसार,सोने दराने शिखर गाठले आहे.आता सोन्यातील घसरण आणखी वाढणार आहे.भारतात सोने आधीच सुमारे १५ टक्के घसरले आहे आणि ही घसरण आणखी वाढू शकते.गोयल यांचा विश्वास आहे की,भारतात सोने १ लाख प्रति १० ग्रॅमच्याही खाली येऊ शकते.त्यामुळे, खरेदीदारांनी सोने खरेदीत अती घाई करू नये.लग्न सराईत सोन्याचे दर कमी झाल्यास सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बांधकाम कामगारांनो सावधान..! योजनांच्या नावाखाली कुणालाही पैसे देऊ नका- न्यू ह्यूमन राईट अँड फाईट रिसर्च फाउंडेशनचे आवाहन

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांच्या नावाखाली काही ठिकाणी एजंट,दलाल,मध्यस्थ किंवा इतर व्यक्तींमार्फत बांधकाम...

पुराचा तडाखा; तब्बल ७०० नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टी व पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा प्रशासनाशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला.यावेळी जिल्हाधिकारी...

रेल्वेच्या धडकेत दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-रेल्वेच्या धडकेत दोन सख्ख्या भावांचा  दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागपूर जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील मालेगाव टाऊन परिसरात आज,गुरुवार ३० जुलै रोजी सकाळच्या...

आज गडचिरोली जिल्ह्यातील पुरामुळे २५ मार्ग बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नुकतेच दोन दिवसांपूर्वी नागपूरच्या  प्रादेशिक हवामान खात्याने गडचिरोली जिल्ह्यासाठी काल,बुधवार २९ जुलै रोजी रेड अलर्ट,तर आज गुरुवारसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला होता. त्यानुसार,जिल्ह्याच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!