Thursday, September 10, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोलीत महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा २०२६ चे उत्साहात उद्घाटन..

गडचिरोलीत महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा २०२६ चे उत्साहात उद्घाटन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-गडचिरोली जिल्हास्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा-२०२६ चे उद्घाटन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते सकाळी जिल्हा क्रीडा संकुल येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे,सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अहेरी कुशल जैन,अमर राऊत आणि एम.अरूण यांची प्रमुख उपस्थिती होती.
उद्घाटनप्रसंगी नीलोत्पल यांनी क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांमुळे शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये संघभावना,नेतृत्वगुण आणि कार्यक्षमता वाढीस लागते,असे प्रतिपादन केले.तर जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केवळ प्रशासकीय कार्यापुरते मर्यादित न राहता क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातही सक्रिय सहभाग नोंदवावा,असे आवाहन केले.अशा स्पर्धांमुळे मानसिक ताण कमी होऊन आरोग्यदायी वातावरण निर्माण होते,असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी खेळाडूंनी क्रीडा शपथ घेतली. विविध क्रीडा प्रकारांसह सांस्कृतिक सादरीकरणांची रंगतदार सुरुवात करण्यात आली.जिल्ह्यातील महसूल विभागातील विविध तालुक्यांतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले असून,स्पर्धा १६,१७ व १८ फेब्रुवारी पर्यंत चालणार आहेत.या स्पर्धांच्या यशस्वी आयोजनासाठी अप्पर जिल्हाधिकारी नितीन गवंडे व संजय आसवले यांनी विशेष प्रयत्न घेतले.
उद्घाटन समारंभास महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी,खेळाडू व क्रीडाप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्यस्तरीय ज्युनियर ‘कुंग फू’ स्पर्धेत वांगेपल्ली शाळेच्या मोहनला कांस्यपदक..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-पुणे येथे पार पडलेल्या २४ व्या राज्यस्तरीय 'ज्युनियर वुशू स्पर्धा-२०२६' मध्ये अहेरी तालुक्यातील वांगेपल्ली येथील शासकीय निवासी शाळेचा इयत्ता दहावीचा विद्यार्थी...

पावसाची विश्रांती; पाण्याचे योग्य नियोजन करण्यासह तण,खत तसेच कीड-रोग व्यवस्थापनाकडे शेतकऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे- कृषी विभाग

उद्रेक न्युज वृत्त :-राज्याच्या विविध भागात ऑगस्ट व सप्टेंबरच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे.अशा परिस्थितीत धान पिकावर पाण्याचा ताण येऊ नये...

आज डोंगरगाव-हलबी येथे एकल महिला मेळावा संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत आज,बुधवार ९ सप्टेंबर रोजी देसाईगंज तालुक्याच्या गट ग्रामपंचायत डोंगरगाव-हलबी येथे परिसरातील चिखली रिट व अरततोंडी येथील...

देसाईगंज पोलिसांची मोठी कामगिरी; हरविलेले २५ मोबाईल मूळ मालकांना परत..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-एकदा कां मोबाईल हरवला, तर तो परत मिळण्याची शाश्वती कमीच असते.मात्र, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर व नागरिकांच्या तक्रारींना त्वरित प्रतिसाद देत देसाईगंज...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!