Wednesday, September 2, 2026
Homeगडचिरोली५८ आरोग्य वर्धिनी केंद्राकरिता आरोग्य अधिकारी नियुक्त..

५८ आरोग्य वर्धिनी केंद्राकरिता आरोग्य अधिकारी नियुक्त..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- जिल्ह्यातील दुर्गम भागात आरोग्य यंत्रणा बळकटीकरणाकडे अजून एक पाऊल टाकतांना जिल्हा परिषद आरोग्य विभागाद्वारे जिल्ह्यातील ५८ आरोग्य वर्धिनी केंद्रात समुदाय आरोग्य अधिकारी नेमण्यात आले आहेत.मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी या नवनियुक्त समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचे समुपदेशन करून त्यांना नियुक्तीच्या ठिकाणीच मुख्यालयात उपस्थित राहून आरोग्य सेवा देण्याचे निर्देश दिले.जिल्हा प्रशासनाद्वारे नुकतेच जिल्ह्यातील १९ प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियुक्ती देण्यात आली होती.तद्नंतर लगेचच आता समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनाही नियुक्ती देण्यात आली आहे.

काल झालेल्या आयुष्यमान भारत कार्यक्रम अंतर्गत जिल्ह्यात समुदाय आरोग्य अधिकारी यांची रिक्त १२२ पदापैकी ५८ पदे समुपदेशनाने भरण्यात आली; अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रताप शिंदे यांनी यांनी दिली.जिल्हा आरोग्यवर्धीनी सल्लागार डॉ. दिक्षांत मेश्राम व  जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. राहुल ठिगळे यांनी समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना प्रशासकीय बाबींचे मार्गदर्शन केले. 

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

ग्रामसेवकांची वर्षातून केवळ एकच संवैधानिक ग्रामसभा घेण्याची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्याच्या शिवरे दिगर येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास ग्रामसभे दरम्यान झालेल्या गोंधळ व दबावामुळे...

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!