Friday, June 19, 2026
Homeगोंदियाप्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर एसीबीच्या जाळ्यात…

प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर एसीबीच्या जाळ्यात…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गोंदिया :- अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या महागाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अतिरिक्त कार्यभार असलेले डॉ.अंबर श्रीराम मडावी वय ४४ वर्षे यांनी ४८ हजार रुपयांची लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याप्रकरणी त्यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे.सदरची कारवाई काल,दिनांक – २४ जून रोजी करण्यात आली.

यातील तक्रारदार हे प्राथमिक आरोग्य केंद्र महागाव येथे कनिष्ठ सहायक म्हणून कार्यरत आहेत.त्यांच्या वेतन निश्चिती,नक्षलभत्ता/प्रोत्साहन भत्ता व अतिरिक्त घरभाडे भत्ता थकबाकीच्या फरकाचे ६,०७,३२० रुपयांचे बील स्वाक्षरी करून जिल्हा आरोग्य अधिकारी,जिल्हा परिषद गोंदिया यांच्या कार्यालयात पाठविण्याकरिता बिलाच्या रकमेवर १० टक्केप्रमाणे ६० हजार रुपयांची लाच मागणी करीत असल्याबाबतची तक्रार ११ जून रोजी लाच लुचपत प्रतिबंधक प्राप्त झाली होती.१२ जून रोजी पथकाने पडताळणी केली.

लाच मागणी पडताळणीदरम्यान आरोपीने तक्रारदाराच्या बिलाच्या ६,०७,३२० रुपये रकमेवर पंचासमक्ष आठ टक्केप्रमाणे ४८ हजार रुपये इतक्या लाचेची मागणी केली व लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविली.यावरून डॉ.मडावी यांना ताब्यात घेण्यात आले आहे.त्यानुसार अर्जुनी मोरगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंजात सुगंधित तंबाखूविक्री जोमात; आरमोरीत अवैध सट्टा-पट्टी,तर कुरखेड्यात दारूचा महापूर..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात अवैध धंद्यांनी डोके वर काढले असून देसाईगंज शहर व तालुक्यात सुगंधित तंबाखूची खुलेआम विक्री,तर आरमोरी शहरापासून ते ग्रामीण...

जीएसटी नंबर मिळवून दिले नं..! आता दहा हजार द्या.. – राज्यकर निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गलेलठ्ठ पगार असतांना एकदा कां ओवर कमाईची सवय लागली रे लागली,तर मग ज्या टेबलावर कुठलेही काम मोफत जरी होत असेल तरी...

स्थानिक उत्पादनांना मिळणार नवी ओळख; गडचिरोली ब्रँडसाठी स्वतंत्र लोगो आणि टॅगलाईन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी स्वतंत्र 'गडचिरोली ब्रँड' विकसित करणे,पर्यटन विकासाला गती देणे,महिला बचत गटांना अधिक सक्षम बनविणे,धान साठवणुकीची क्षमता...

गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – गडचिरोली हे भविष्यात देशातील महत्त्वाचे औद्योगिक व पोलाद उत्पादन केंद्र म्हणून...

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-महाराष्ट्राला देशातील ‘ग्रीन स्टील हब’ बनविण्याच्या उद्देशाने केंद्रीय कोळसा व खनिकर्म मंत्रालयाने गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात,अशी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!