Sunday, September 6, 2026
Homeगोंदिया३१ वर्षीय विवाहित महिलेचा शेतातील बोडीत पडून दुर्दैवी मृत्यू..

३१ वर्षीय विवाहित महिलेचा शेतातील बोडीत पडून दुर्दैवी मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-तालुक्याच्या पुराडा गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या महाजनटोला येथील एका ३१ वर्षीय विवाहित महिलेचा शेतातील बोडीमध्ये पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल बुधवारी सकाळच्या सुमारास घडली.सरिता ओमप्रकाश आचले वय ३१ वर्षे,रा.महाजनटोला, ता.गोंदिया असे मृत पावलेल्या महिलेचे नाव असून ती शेत शिवारातील बोडीजवळ शौचास बसलेली होती.
महाजनटोला येथील सरिता आचले ही काल बुधवारी सकाळी शेतावर गेली होती.दरम्यान,सरिता शौचासाठी बोडीजवळ बसली असता तिचा पाय घसरून ती बोडीत पडली.यातच सरिताचा दुर्दैवी मृत्यू झाला.शेतात गेलेली सरिता घरी लवकर परत न आल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला असता सकाळी साडे आठ वाजताच्या सुमारास शेताजवळील बोडीतील सरिताचा मृतदेह तरंगताना आढळला.घटनेची माहिती मिळताच सालेकसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.नागरिकांच्या मदतीने मृतदेह पाण्यातून बाहेर काढून देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवून शवविच्छेदन करण्यात आले.सरिता पश्चात पती,एक मुलगा,एक मुलगी असून सरिताच्या मृत्यूमुळे दोन मुले आईच्या प्रेमाला कायमची मुकली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

तलावात मासे पकडत असतांनाच पाय घसरल्याने तलावात पडला; चिमुकल्याचा तलावात बुडून मृत्यू.. -दुसऱ्या घटनेत भारतीय सैन्य दलातील जवानाचा पाण्यात बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील निलज गावातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शाळेला सुट्टी असल्याने मित्रांसोबत गाव नजीकच्या तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या...

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!