Tuesday, October 27, 2026
Homeदेसाईगंज२७ वर्षीय तरुणाने गळफास घेत संपवली जीवनयात्रा; आज सकाळची घटना..

२७ वर्षीय तरुणाने गळफास घेत संपवली जीवनयात्रा; आज सकाळची घटना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या नगर परिषद हद्दीत येणाऱ्या नैनपूर येथील एका २७ वर्षीय तरुणाने घरी कुणीही नसतांना स्वतःच्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना आज,मंगळवार २७ ऑक्टोंबर रोजी सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.सुनील काशिनाथ पुंड वय २७ वर्षे, रा.नैनपूर,ता.देसाईगंज,जि.गडचिरोली असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
माहितीनुसार,सुनील हा काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली होता.अश्यातच आज सकाळी सुनीलचे वडील व लहान भाऊ कामानिमित्त बाहेर गेले होते,तर त्याची आई कपडे धुण्याकरिता बाहेर गेली होती.त्याची आई काही वेळाने घरी परतली असता सुनील हा घराच्या समोरील हॉलमधील सीलिंगच्या हुकाला नायलॉन दोरीच्या सहाय्याने लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. समोरील दृश्य पाहून आईने एकच खंबरडा फोडला. घटनेची माहिती होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत तात्काळ देसाईगंज पोलिसांना पाचारण केले.पोलिसांनी घटनास्थळ गाठून सुनीलला देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात नेले.तेथील डॉक्टरांनी तपासणी अंती त्याला मृत घोषित केले.दरम्यान, पोलिसांना सुनीलच्या खिशात एक चिट्ठी सापडली आहे.चिठ्ठीत आत्महत्येचे कारण नमूद असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.प्राथमिक माहितीनुसार सदरची आत्महत्या ही प्रेम संबंधातून  झाल्याची चर्चा असून याबाबत अधिकची स्पष्टता ही पोलीस तपासातून उघड होणार आहे.प्रकरणाचा पुढील तपास देसाईगंज पोलीस प्रशासन करीत आहे.घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पुंड कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागपूर पदवीधर मतदारसंघात कोण मारणार बाजी? राजकीय वर्तुळात उत्सुकता..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल आज,मंगळवार २७ ऑक्टोंबरला जाहीर होणार असून अभिजीत वंजारी वर्सेस सुधाकर कोहळे यांच्यापैकी कोण बाजी मारणार,याबाबत...

सावंगीच्या जिल्हा परिषद शाळेत एमएसडब्लू विद्यार्थ्यांचे क्षेत्रकार्य संपन्न; विविध उपक्रमांतून सामाजिक जागृती..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-अनिकेत समाजकार्य महाविद्यालय देसाईगंज येथील एमएसडब्लू(MSW) प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सावंगी येथे २१ ऑगस्ट ते २६ ऑक्टोंबर २०२६...

उपाययोजनांचे सकारात्मक फलित; गडचिरोली जिल्ह्यात रस्ते अपघातातील मृत्यूंमध्ये २७ टक्के घट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जानेवारी ते सप्टेंबर २०२६ या नऊ महिन्यांत रस्ते अपघातांतील मृत्यूंच्या संख्येत गतवर्षीच्या समान कालावधीच्या तुलनेत २७ टक्के घट नोंदविण्यात आली...

विधान परिषद निवडणूक; उद्याला तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या उमेदवारांचा फैसला..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या पाच जागांसाठी शुक्रवार २३ ऑक्टोंबर २०२६ रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडली.यामध्ये नागपूर पदवीधर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!