- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-तीन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या एका ११ वर्षीय शालेय विद्यार्थ्याचा अपहरण करून खून झाल्याची घटना आज,बुधवार १७ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास नागपूर जिल्ह्याच्या खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली.जित युगराज सोनेकर वय ११ वर्षे,रा.चनकापुर,ता.सावनेर,जि.नागपूर असे खून झालेल्या चिमुकल्याचे नाव असून तो शंकरराव चव्हान इंग्लीश मीडीयम शाळा,प्रकाशनगर,खापरखेडा येथे सहाव्या वर्गात शिकत होता.प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.चनकापुर येथील रहिवासी असलेले राहुल गौरीलाल पाल वय २५ वर्षे,अरूण बैचु भारती वय २५ वर्षे व यश गिरीश वर्मा वय २१ वर्षे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
११ वर्षीय जित हा नेहमीप्रमाणे सोमवार १५ सप्टेंबर २०२५ रोजी शाळेत जाण्यासाठी निघाला होता.त्या दिवशी मुलगा घरी परतला नसल्याने कुटुंबीयांनी चिंता व्यक्त केली.सायंकाळ होऊन रात्रही झाली,तरी मुलगा शाळेतून घरी कां आला नाही म्हणून कुटुंबीयांनी सर्वत्र शोधाशोध केली.शोधाशोध करुनही मुलगा सापडला नसल्याने आई नीलीमा युगराज सोनेकर वय ३५ वर्षे, चनकापुर,ता.सावनेर यांनी खापरखेडा पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदवली होती.त्यानुसार पोलिसांनी सर्वप्रथम ओळखीचे नातेवाईक,मित्र,शाळेतील शिक्षक यांच्याकडून माहिती घेत शोध सुरू केला.अखेर आज बुधवारी चनकापूर कॉलनी शिवारातील झुडुपात एका मुलाचा मृतदेह आढळल्याची माहिती खापरखेडा पोलिसांना मिळाली.पोलिसांनी घटनास्थळ गाठुन चौकशी केली असता तो जित सोनेकर असल्याची ओळख पटली.त्यानुसार पोलिसांनी परिसरातील संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज तपासले असता भानेगाव बसस्थानक परिसरात असतांनाच आरोपींनी अरूण भारतीच्या कारमध्ये डांबून जितचे अपहरण केले होते. पोलीस मागावर असल्याची भनक आरोपींना होताच त्यांनी जितचा गळा दाबून हत्या केल्याची कबुली दिली. आरोपींनी चिमुकल्याचे अपहरण खंडणीसाठी केले असावे,असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
- Advertisement -

