Thursday, September 3, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तहृदयस्पर्शी कविता..! पोट तुझं भरलं असेल तर, देवा माझ्यासाठी घेऊ का,...

हृदयस्पर्शी कविता..! पोट तुझं भरलं असेल तर, देवा माझ्यासाठी घेऊ का, तुझं राहिलेलं उष्ट, माझ्या घरी मी नेऊ का…? देवा इथे मात्र तुमची, मस्त अंगत-पंगत रंगलीय, घरात पीठ नाही म्हणून, सकाळीच आई बाबासोबत भांडलीय…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-कविता कुणी लिहिली माहीत नाही.पण कवितेचे स्वरूप आणि त्यातील एक-एक शब्द काळजाचा ठेका चुकवून सोडणारा आहे.आपण श्रद्धा म्हणून देवाला पुरण-पोळी,नारळ व नाना तऱ्हेचे नैवेद्य टाकत असतो.मात्र,आजही जगात भुकेमुळे कितीतरी जण मृत्युमुखी पडतात.त्यामुळे एका कवीने भूक आणि देव यातील अत्यंत मार्मिक शब्दरूपी रचना मांडली आहे.सध्या ही कविता सोशल मीडियावर खूप वायरल होत आहे.
 
पोट तुझं भरलं असेल तर,
देवा माझ्यासाठी घेऊ का,
तुझं राहिलेलं उष्ट,
माझ्या घरी मी नेऊ का…?
देवा इथे मात्र तुमची,
मस्त अंगत-पंगत रंगलीय,
घरात पीठ नाही म्हणून,
सकाळीच आई बाबासोबत भांडलीय.
मूठभर पिठासाठी,
आई सगळ्या गल्लीत हिंडली,
सगळ्या शेजारच्यांनी,
तुझ्या नैवेद्याची सबब सांगितली.
देवा आज सकाळी मला,
सडकून भूक लागली,
अचानक तुला आठवून,
तुझ्या मंदिराकडे धूम ठोकली.
देवा मला तुझा
कधी-कधी हेवा वाटतो,
एका जाग्यावर बसून,
मस्त नैवेद्याचा मलिदा लाटतो.
दर्शनासाठी आलेल्या लोकांनी,
नारळाचा तुकडा हातावर ठेवला,
तुला मात्र देवा त्यांनी,
अर्धा नारळच वाहिला.
माफ कर देवा मला,
तुझा घास हिसकावतोय,
अर्ध्या कोर तुकड्यासाठी,
भाऊ माझा घरात रडतोय.
देवा मी आता ठरवलंय,
तुझ्यासोबत बंड करायचं,
माझ्या भाकरीच्या प्रश्नासाठी,
स्वतःच पेटून उठायचं..!
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!