Tuesday, September 1, 2026
Homeनागपूरहातात मोबाईल अन् कानात इअर फोन घालून रेल्वे रुळावरून जातांना अनर्थ घडला…-१७...

हातात मोबाईल अन् कानात इअर फोन घालून रेल्वे रुळावरून जातांना अनर्थ घडला…-१७ वर्षीय विद्यार्थ्याचा घटनास्थळीच मृत्यू…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :- रेल्वे रुळावरून पायी चालत शेताकडे जात असलेल्या विद्यार्थ्याला धावत्या रेल्वेने जोरात धडक देत फरफटत नेले.यात डोके शरीरापासून वेगळे झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.त्याच्या कानात मोबाइल फोनचे इअर फोन होते; अशी माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली.ही घटना रामटेक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मनसर शिवारात काल,शुक्रवारी दि.५ ला सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली.

आर्यन किशोर केकती वय १७ वर्षे,रा.मनसर, ता. रामटेक असे मृत विद्यार्थ्यांचे नाव आहे.आर्यन शुक्रवारी सकाळी सायकलने एकटाच शेतात गेला होता.त्याने सायकल रेल्वे रुळालगत उभी केली आणि पायी शेताच्या दिशेने निघाला.त्यातच रामटेकहून नागपूरला वेगात जाणाऱ्या रेल्वेगाडीने त्याला जोरात धडक दिली.तो गाडीसोबत किमान ५० फुटांपर्यंत फरफटत गेला आणि नंतर चाकाखाली आला.त्यामुळे डोके शरीरापासून वेगळे झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

आर्यनने यावर्षीच दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली होती. त्याला धाकटा भाऊ असून,आई व वडील शेतीसोबतच मजुरीचे काम करतात.आर्यन आईवडिलांना कामात हातभार लावायचा.माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आणि आर्यनचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रामटेक शहरातील उपजिल्हा रुग्णालयात नेले. याप्रकरणी रामटेक पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

सलग २४ तास हस्तलेखनाचा अनोखा राष्ट्रीय विक्रम.. चंद्रपूरच्या वैष्णवी मांडवकरची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-चंद्रपूरची गुणी कन्या वैष्णवी विश्र्वंभर मांडवकर हिने सलग २४ तास अखंड हस्तलेखन (Handwriting)करून 'सांगितिक वारसा आणि कौटुंबिक प्रवास' हे ८३ पानांचे...

खत उत्पादक कंपनी अथवा विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना गरज नसलेल्या निविष्ठांची खरेदी करण्याची सक्ती करू नये- कृषी विभाग -सक्ती अथवा जादा दराने विक्रीबाबत तक्रार नोंदविण्याचे...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर रास्त दरात आणि पुरेशा प्रमाणात खते व निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाकडून नियमित नियंत्रण व तपासणी करण्यात...

पॅकेजिंगचा झोल; एक्सपायरी डेट बदलून पुन्हा बाजारात विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.. -तब्बल ७५ लाखांहून अधिक किंमतीचा मुदतबाह्य साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दुकानात पॉकीटामध्ये मिळणारे विविध अन्न पदार्थ चवदार म्हणून आपण मोठ्या आवडीने खात असतो.प्रत्येक पॉकीटांवर सुरक्षित अन्नपदार्थांच्या चविंसाठी विशिष्ट कालमर्यादा नमूद केलेली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!