Monday, August 17, 2026
Homeनागपूरसोशल मीडियाच्या स्नॅपचॅटवर ओळख; बोलणे बंद करताच अश्लील फोटो व व्हिडीओ क्लिप...

सोशल मीडियाच्या स्नॅपचॅटवर ओळख; बोलणे बंद करताच अश्लील फोटो व व्हिडीओ क्लिप केले व्हायरल.. – आरोपी तरुणास बेड्या..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-एका २६ वर्षीय तरुणाची सोशल मीडियाच्या स्नॅपचॅटवर १९ वर्षीय तरुणीशी ओळख झाली.दोघांचेही स्नॅपचॅटवर चॅटिंग सुरू झाले. चॅटिंगदरम्यान तरुण हा आपल्या नातेसंबंधातीलच असल्याची बाब तिला कळली.त्याच्यावर विश्वास ठेवत प्रत्येक गोष्टी शेअर झाल्या.तिच्या स्नॅपचॅटचा आयडीसुद्धा तरुणाला माहीत होता.स्नॅपचॅटच्या माध्यमातूनच दोघांची ओळख अधिक घट्ट झाली.अश्यातच वर्षभरापूर्वी तरुण हा तरुणीला भेटण्यासाठी उमरेड येथे गेला.त्यानंतर,कर्हांडला मार्गावरील एका हॉटेलमध्ये नेत तिला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले.दरम्यान,सहा महिन्यांपूर्वी तरुणीने तरुणाबाबत कुटुंबीयांना सांगितले असता कुटुंबीयांनी बोलण्यास नकार दिला.तेव्हापासून तिने बोलणे बंद करताच तो चिडला.रूमवर भेटण्यासाठी ये, असा तगादाही त्याने सुरू केला.तिने भेटण्यास नकार दर्शविल्यानंतर आपल्या दोघांचेही फोटो आणि व्हिडीओ माझ्याकडे असून,ते तुझ्या कुटुंबीयांना,मित्र-मैत्रिणींना दाखवतो.तुझी बदनामी करतो,अशी धमकी तो वारंवार देऊ लागला.दरम्यान,२८ मार्च २०२६ रोजी आरोपी तरुणाने पुन्हा धमकीतंत्राचा वापर करीत उमरेड येथील एका दर्ग्याजवळ तिला भेटण्यासाठी बोलावले.घराकडे परतल्यानंतर काही वेळातच तिच्या नातेवाइकाकडून स्नॅपचॅटवर अश्लील व्हिडीओ आल्याचे सांगितले. काही वेळातच व्हिडीओ डिलीट झाला.त्यानंतर,१३ एप्रिल २०२६ च्या रात्री आठ ते नऊ वाजेदरम्यान पुन्हा पीडितेच्या स्नॅपचॅट आयडीवरून आरोपी आणि तिचे अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्याची बाब समोर आली. अखेरीस तरुणीने पोलिसांत तक्रार नोंदविली.याप्रकरणी उमरेड पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता(बीएनएस) कलम ६४,माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० सहकलम ६६ (ई),६७(अ) अन्वये गुन्हा नोंदवून अटक केली आहे.मोहम्मद जुनैद सादिक शेख वय २६ वर्षे, रा.कोष्टीपुरा शाळेजवळ, भिवापूर,जि.नागपूर असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.तर पीडित १९ वर्षीय तरुणी उमरेड येथील एका कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे.प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार धनाजी जळक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या कारचा भीषण अपघात; पोलिस कर्मचारीचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या चंद्रपूर-मूल मार्गावरील वलनी- बोर्डा वळण मार्गावर आज,सोमवार १७ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास झालेल्या भीषण कार अपघातात एका महिला पोलिस कर्मचारीचा...

गॅस सिलेंडरधारक ग्राहकांसाठी दिलासा; ई-केवायसी करण्यास मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी असून एलपीजी गॅस कनेक्शनची ई-केवायसी करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि साठेबाजी...

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने दुचाकीस्वार तरुणांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने घडलेल्या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर-रामटेक राष्ट्रीय...

साखरेच्या दरवाढीने सर्वसामान्यांच्या तोंडचा गोडवा हिरावला..!

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच गुरुवार १३ ऑगस्ट २०२६ पासून श्रावण महिन्यास सुरुवात झाली.आजचा सोमवार व येत्या २४ ऑगस्ट,३१ ऑगस्ट आणि ७ सप्टेंबर पर्यंत चार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!