Monday, September 7, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तसोन्याच्या दरात उसळी; सर्वसामान्यांचे बजेट विस्कटले..!

सोन्याच्या दरात उसळी; सर्वसामान्यांचे बजेट विस्कटले..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-जागतिक बाजारातील आर्थिक अनिश्चितता,विदेशी चलन म्हणजेच डॉलरच्या मूल्यातील चढउतार,त्याचबरोबर गुंतवणूकदारांचा वाढता कल, यामुळे सोन्याच्या दरात सतत उसळी(वाढ)होतांना दिसून येत आहे.सोन्याच्या दराची उसळी पाहता ग्राहकांमध्ये मोठी खळबळ माजली असून सोने खरेदी करू पाहणाऱ्या सर्वसामान्यांचे बजेट पूर्णपणे विस्कटले आहे. आजची स्थिती बघितली तर चालू सप्टेंबर महिन्यात जीएसटीसह सोन्याच्या दरात तब्बल ७ हजार ४४३ रुपयांची वाढ झाली आहे.एकाच दिवसात सोन्याच्या दरात तब्बल ६०० रुपयांची उसळी नोंदवली गेली. नागपुरात काल सोमवारी ३ टक्के जीएसटीसह २४ कॅरेटचे सोने १ लाख ११ हजार ३४३ रुपयांत विकले गेले.समोर नवरात्र,दसरा आणि दिवाळीसारखा मोठा सण येत आहे.ऐन सणासुदीच्या दिवसांत सोन्याच्या किंमती भाव खाऊ लागल्या आहेत.अश्यातच सोन्याच्या दरात अशीच वाढ होत राहिली तर पुढील काळात लग्नसमारंभासाठी सोने खरेदी करणाऱ्या कुटुंबांचे बजेट पूर्णपणे कोलमडल्याशिवाय राहणार नाही.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मध्यरात्री तरुणाचा धारदार शस्त्राने खून..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २५ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची घटना नागपूर शहराच्या सीताबर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आमदार निवासस्थानाजवळील एका गल्लीत मध्यरात्रीच्या...

सर्जा-राजाप्रती कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या सणावर महागाईचे सावट..

उद्रेक न्युज वृत्त :-शेतकरी बांधवांच्या सुख-दुःखात वर्षभर खांद्याला-खांदा लावून राबणाऱ्या सर्जा-राजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा बैलपोळा सण अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे.मात्र,यंदा पोळ्याच्या उत्साहावर...

मॉन्सूनचा प्रभाव कमी; आजपासून सूर्य आग ओकण्याच्या तयारीत..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-काही दिवसांपूर्वी विदर्भात सक्रिय असलेला मान्सून परतीच्या मार्गावर असल्याने आज,सोमवार ७ सप्टेंबरपासून सूर्य आग ओकून तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता प्रादेशिक...

माजी सरपंचांनाच प्रशासक म्हणून कायम ठेवण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतींवर तत्कालीन सरपंच हे प्रशासक म्हणून नेमण्यात आले होते.अश्यातच माजी सरपंचांच्या सहा महिन्यांच्या काही प्रशासक पदाची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!