Monday, September 7, 2026
Homeगडचिरोलीपरदेशात ५ हजार नोकरीच्या संधी.. - “होम बेस्ड हेल्थ केअर गिव्हर...

परदेशात ५ हजार नोकरीच्या संधी.. – “होम बेस्ड हेल्थ केअर गिव्हर वर्कर्स” पदासाठी इच्छूक उमेदवारांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-भारत सरकार व इस्रायल सरकार यांच्यात विशिष्ट कामगार क्षेत्रांमध्ये तात्पुरत्या रोजगारासाठी फ्रेमवर्क करार झाला असून त्याअंतर्गत दोन अंमलबजावणी प्रोटोकॉल्सवर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. यापैकी प्रोटोकॉल- B हा काळजीवाहक क्षेत्राशी संबंधित आहे.इस्रायल सरकारने भारताकडून ५ हजार घरगुती काळजीवाहकांची(होम बेस्ड हेल्थ केअर गिव्हर वर्कर्स)मागणी व्यक्त केली आहे.या मागणीची तातडीने पूर्तता करण्यासाठी कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय(MSDE) कार्यरत आहे.राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना त्यांच्या कार्यक्षेत्रातून योग्य उमेदवारांची जागृती व प्राथमिक छाननी(mobilization and pre-screening)करून मंत्रालयाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.इस्राईल देशात “होम बेस्ड हेल्थ केअर गिव्हर वर्कर्स” या पदासाठी ५ हजार नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.सदर पदाचे कार्य विवरण,वयोमर्यादा,शैक्षणिक पात्रता,पदभरती अर्ज इत्यादी माहिती https://maharashtrainternational.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे.इच्छूक उमेदवारांनी सदर लिंकवर जावून आपला अर्ज सादर करावा.अधिक माहितीकरिता त्या-त्या जिल्ह्यातील जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या ठिकाणी संपर्क साधावा.तर गडचिरोली जिल्ह्यातील इच्छूक उमेदवारांनी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कॉप्लेक्स एरिया पोलीस मुख्यालयासमोर गडचिरोली येथील कार्यालयाशी संपर्क साधावा,असे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त योगेंद्र शेंडे यांनी कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मध्यरात्री तरुणाचा धारदार शस्त्राने खून..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २५ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची घटना नागपूर शहराच्या सीताबर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आमदार निवासस्थानाजवळील एका गल्लीत मध्यरात्रीच्या...

सर्जा-राजाप्रती कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या सणावर महागाईचे सावट..

उद्रेक न्युज वृत्त :-शेतकरी बांधवांच्या सुख-दुःखात वर्षभर खांद्याला-खांदा लावून राबणाऱ्या सर्जा-राजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा बैलपोळा सण अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे.मात्र,यंदा पोळ्याच्या उत्साहावर...

मॉन्सूनचा प्रभाव कमी; आजपासून सूर्य आग ओकण्याच्या तयारीत..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-काही दिवसांपूर्वी विदर्भात सक्रिय असलेला मान्सून परतीच्या मार्गावर असल्याने आज,सोमवार ७ सप्टेंबरपासून सूर्य आग ओकून तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता प्रादेशिक...

माजी सरपंचांनाच प्रशासक म्हणून कायम ठेवण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतींवर तत्कालीन सरपंच हे प्रशासक म्हणून नेमण्यात आले होते.अश्यातच माजी सरपंचांच्या सहा महिन्यांच्या काही प्रशासक पदाची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!