उद्रेक न्युज वृत्त :- आपण कधी ना कधी सोने खरेदी करतोच.सोने हे नगदी तात्काळ पैसा मिळवून देणारे एक उत्तम पर्याय आहे.मात्र,आपण खरेदी केलेले सोने खरे की खोटे? त्याची शुद्धता कशी ओळखावी?सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. ग्राहकांनी हॉलमार्क चिन्ह पाहूनच खरेदी करावी. हॉलमार्क ही सोन्याची सरकारी हमी आहे; ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते.हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स ॲक्ट, नियमांनुसार चालते.सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात.२४ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर ९९९,२३ कॅरेटवर ९५८,२२ कॅरेटवर ९१६,२१ कॅरेटवर ८७५ आणि १८ कॅरेटवर ७५० असे लिहिलेले असते.बहुतेक सोने २२ कॅरेटमध्ये विकले जाते.तर काही लोक १८ कॅरेट देखील वापरतात.
२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?👇
२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आणि २२ कॅरेट सोने अंदाजे ९१ टक्के शुद्ध आहे.२२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी,जस्त यासारखे ९% इतर धातू मिसळून दागिने तयार केले जातात.२४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्यापासून दागिने बनवता येत नाही.त्यामुळे बहुतांश दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.
मिस्ड कॉलवरून किंमत घ्या जाणून👇
२२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचे किरकोळ दर जाणून घेण्यासाठी,तुम्ही ८९५५६६४४३३ वर मिस कॉल करू शकता.काही वेळात एसएमएसद्वारे दर उपलब्ध होतील.याशिवाय, सतत अपडेट्सच्या माहितीसाठी तुम्ही www.ibja.co किंवा ibjarates.com ला भेट देऊ शकता.

