उद्रेक न्युज वृत्त
कुरखेडा(गडचिरोली) :-आदिवासी ग्रामीण विकास शिक्षण संस्था कुरखेडा द्वारा संचालित ‘संस्कार पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज’ कुरखेडा यांनी आपल्या उज्वल निकालाची परंपरा आजही कायम ठेवली आहे.कुरखेडा येथील संस्कार पब्लिक स्कूल दहावी वर्गाचा निकाल शंभर टक्के टक्के लागलेला असल्याने शाळेने निकालाची परंपरा मागील ४ वर्षांपासून कायम राखली आहे.
संस्कार पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज कुरखेडा येथील विद्यार्थी काव्य जागेश्वर सोरते याने ८९.४० टक्के प्राप्त करीत शाळेमधून प्रथम येण्याचा मान पटकावला आहे.तर श्रुती विजय गजभिये हिने ८८.२० टक्के प्राप्त करीत शाळेतून द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे.तर प्रिनल बाळकृष्ण बोरकर हिने ८६.४० टक्के मिळविले असून शाळेतून तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.तसेच आयुष चौधरी ८६.२० टक्के,सम्यक सहारे ८६ टक्के,विधी बंसोड ८३.६० टक्के,अंश मेश्राम ८२ टक्के, अल्फोंसा नैताम ८२ टक्के, प्रांजल काचीनवार ८०टक्के,गुंजन राऊत ७९.८०टक्के, सिद्धार्थ शेंडे ७८.४० टक्के,विष्णू उईके ७६.८० टक्के,शाळेतील विद्यार्थ्यांनी ७५ टक्के पेक्षा जास्त टक्के प्राप्त करून शाळेचा नाव लौकिक केला.
यावेळी आदिवासी ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे पदाधिकारी शाळेचे प्राचार्य व शिक्षकाचे उत्कृष्ट मार्गदर्शन,शाळेत होणारे नियमित वर्ग,नियमित चाचण्या,शाळेत मिळणाऱ्या विविध सोयी सुविधा, शाळेतील मोफत वायफाय यामुळेच हे यश प्राप्त करता आले; असे गुणवंत विद्यार्थ्यांनी सांगितले आहे .
या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय शाळेचे प्राचार्य देवेंद्र फाये,बी.के.दाऊदसरिया,आर.जे.पवार, एम.जी.वाईकर, एम.आर.ठाकूर,एन.के.निरंकारी, एच. एम. मुसानी यांना दिलेले आहे.या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष मोहन अरमरकर,संस्था कोषाध्यक्ष वामनराव फाये, संस्था सचिव दोषहरराव फाये,उपाध्यक्ष गजानन येलतुरे,संस्था सहसचिव प्रा.नागेश्वर फाये,संस्था सदस्य इंजि.गुणवंत फाये,शाळा समिती सदस्य चांगदेव फाये, संस्था सदस्य हुंडीराज फाये,विमलताई फाये,वर्षाताई फाये,शाळेचे प्राचार्य देवेंद्र फाये व संस्थेचे सर्व कार्यकारणी मंडळ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी केलेले आहे.

