Monday, August 24, 2026
Homeदेसाईगंजसेवा निवृत्त कर्मचरी कामांवर न घेता; सुशिक्षित बेरोजगारांना कामांवर घ्या - नरेश...

सेवा निवृत्त कर्मचरी कामांवर न घेता; सुशिक्षित बेरोजगारांना कामांवर घ्या – नरेश वासनिक

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज : –  राज्यात सुशिक्षित बेरोजगारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून त्यांच्या हाताला तात्पुरते पोट भरण्याइतके देखील काम मिळत नाही.खूप शिकून शेवटी बेरोजगार राहण्याची वेळ त्यांच्यावर आली असल्याने सर्वप्रथम सुशिक्षीत बेरोजगारांना कामावर घेण्यात यावे; अशी मागणी समाजवादी पक्षाचे देसाईगंज  शहराध्यक्ष नरेश वासनिक यांनी केली आहे.

कोणत्याही शासकीय कार्यालयात अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांना त्याच कार्यालयात मानधन देऊन कामावर ठेवले जाते.हा एकप्रकारे बेरोजगारावर अन्याय करणे आहे.संपूर्ण आयुष्य शासकीय नोकरीत घालवून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळते,मग त्यांना नोकरीची गरज काय? त्याऐवजी सुशिक्षित बेरोजगाराला त्याची जास्त गरज आहे; सुशिक्षित बेरोजगाराच्या हाताला काम मिळाल्यामुळे त्याच्या परिवाराचा उदरनिर्वाह चालवला जाऊ शकतो.

सुशिक्षित बेरोजगारांच्या या मागणीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,विरोधी पक्षनेते अजित पवार,भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गंभीरपणे लक्ष देऊन बेरोजगारांच्या हाताला काम मिळवून द्यावे; अशी मागणी समाजवादी पक्षाचे देसाईगंज शहराध्यक्ष नरेश वासनिक यांनी केली आहे. 

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अंगावर भिंत कोसळून चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातून आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे.अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खामखुरा गावात घरासमोरील अंगणात...

माता व बालक मृत्यू प्रकरणी चौकशी समिती गठीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी येथील प्रसूती प्रकरणात माता व बालकाच्या मृत्यूची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक स्तरावर चौकशी समिती गठीत करण्यात...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयात वाणिज्य विद्यार्थी अभ्यास मंडळाची स्थापना.. – विद्यार्थ्यांनी आत्मनिर्भर बनावे- प्रा.डॉ.निलेश हलामी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डाॅ.श्रीराम गहाणे यांच्या मार्गदर्शनात शैक्षणिक सत्र २०२६-२७ करिता वाणिज्य विद्यार्थी अभ्यास मंडळाची स्थापना...

धावत्या बसमधून खाली कोसळताच दुसऱ्या बसने चिरडले; तरुणीचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-पुण्यातील सिंहगड मार्गावरील माणिकबाग परिसरात आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली. खानापूर-स्वारगेट मार्गावरील धावत्या पुणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!