Thursday, June 4, 2026
Homeगडचिरोलीसुरजागडवरून लोह खनीज भरून येणाऱ्या ट्रकची दुचाकीला धडक; एकजण ठार.. - गडचिरोलीच्या...

सुरजागडवरून लोह खनीज भरून येणाऱ्या ट्रकची दुचाकीला धडक; एकजण ठार.. – गडचिरोलीच्या इंदिरा गांधी चौकातील घटना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोह खाणीतून खनिज भरून येणाऱ्या ट्रकची दुचाकीला जोरदार धडक बसल्याने दुचाकीवरील एकजण जागीच ठार झाला तर दुसरा सुखरूप असल्याची घटना आज,रविवार २५ मे रोजी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास गडचिरोली शहराच्या इंदिरा गांधी चौकात घडली.गणेश चौधरी वय २८ वर्षे, रा.ता.मुल, जि.चंद्रपूर असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव असून तो खादी ग्रामोद्योग चंद्रपूर येथे नोकरीवर होता.
माहितीनुसार,सुरजागड वरून लोह खनीज वाहतूक करणारा एम एच ३४ बी जी ७१३५ क्रमांकाचा ट्रक शहराच्या इंदिरा गांधी चौकात येताच चामोर्शी मार्गाहून धानोरा मार्गे वळण घेत होता.तितक्यातच आरमोरी मार्गाहून दुचाकीने येत असलेले दोघे मित्र गणेश आणि राहुल हे सुद्धा धानोरा मार्गे जात असतांना ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.धडक देताच दुचाकीच्या मागे बसलेला गणेश ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.तर राहुल थोडक्यात बचावला. घटना घडताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मोठी गर्दी केली.काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.घटनेची माहिती कळताच गडचिरोली पोलिसांनी घटनास्थळ गाठत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल केला.मृत गणेश हा आज रविवार सुट्टी असल्याने मित्राला भेटायला गडचिरोली येथे आला होता.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात मनाई आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मोहरम उत्सव तसेच माओवादी संघटनेच्या टी.सी.ओ.सी.(TCOC)कालावधीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ च्या कलम ३७...

भरधाव चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक; तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातच नव्हे तर सर्वत्र भीषण अपघाताच्या घटना मोठ्या प्रमाणावर उघडकीस येऊ लागल्या आहेत.आपण आपल्या साईडने जात असो वा कितीही नियंत्रित वाहन...

अन्न व औषध प्रशासन विभागाचा छापा; मोठा औषध साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-कोणत्याही वैज्ञानिक आधाराशिवाय खोटे दावे करणे आणि जाहिरात करून औषध विकणे कायद्यानुसार गंभीर गुन्हा असूनही काहीजण आक्षेपार्ह जाहिराती तसेच निकृष्ट दर्जाची...

अल्पवयीन मुलांची प्रेयसीची हौस पुरवण्यासाठी लाखो रुपयांची चोरी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-दोन अल्पवयीन मुलांनी चक्क प्रेयसींची हौस पुरवण्यासाठी लाखो रुपयांची चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस तपासात समोर आल्याने पोलिसही चक्रावून गेल्याची घटना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!