- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-सोशल मीडियाचे जाळे खूप दूरवर पसरलेले आहेत.याचा वापर काहीजण मनोरंजन म्हणून करतोय, तर काहीजण देश विघातक कृत्य करण्यासाठी करू लागला आहे.२२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मीरच्या पहलगामपा सून काही किलोमीटर अंतरावर प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या बैसरन व्हॅली येथील मैदानावर दुपारी अडीच वाजेच्या सुमारास दहशतवाद्यांनी घोडेस्वारीचा आनंद लुटणाऱ्या पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार केला होता.दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता.दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष वाढून युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती.युद्धबंदीची घोषणा करून युद्ध विराम झाले असले तरीही एकमेकांविषयीची द्वेष भावना अजूनही कायमच आहे.अश्यातच पाकिस्तानमधील नागरिकांच्या संपर्कात असलेल्या भारतीय नागरिकांवर सुरक्षा यंत्रणांची करडी नजर आहे.करडी नजर असतांनाच नागपूरच्या कामठीतील एक शिक्षक आणि एक व्यापारी पाकिस्तानमधील सोशल मीडियाच्या ग्रुपवर सक्रिय असल्याचे लक्षात आले.सदरची बाब लक्षात येताच एटीएस म्हणजेच दहशतवादविरोधी पथक यांनी ४२ वर्षीय एका शिक्षकासह ४० वर्षीय व्यापाऱ्यास ताब्यात घेऊन दोघांच्याही मोबाइलमधील डेटा जप्त करून दिवसभर चौकशी केल्यानंतर दोघांची सुटका करण्यात आली.त्यांनी सोशल मीडियाच्या ॲपवरून पाकिस्तानमधील काही नागरिकांशी संवाद साधल्याचे निष्पन्न झाले आहे.प्रकरणी दोघांवर अद्याप कुठलाही गुन्हा दाखल झाला नसला तरीही गरज भासल्यास त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात येईल,असे एटीएसचे सहाय्यक पोलिस आयुक्त संतोष वैरागडे यांनी
स्पष्ट केले आहे.
- Advertisement -

