Thursday, October 22, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तसावधान..! सायबर चोरट्यांचा नवा फंडा..! व्हॉट्सॲपवर लग्न पत्रिका पाठवून चोरटे बँक खाते...

सावधान..! सायबर चोरट्यांचा नवा फंडा..! व्हॉट्सॲपवर लग्न पत्रिका पाठवून चोरटे बँक खाते करू लागले रिकामे..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-सध्याच्या घडीला मोठ्या प्रमाणावर व्हॉट्सॲपचा ट्रेण्ड वाढलेला दिसून येतो. फोटो, व्हिडिओ,सेल्फी,शासकीय दस्तऐवज व इतर महत्वाच्या फाईल एकमेकांना व्हॉट्सॲपवर आदान-प्रदान केल्या जातात.अशातच प्रत्यक्ष भेटून पत्रिका देण्यापेक्षा पै-पाहुणे व्हॉट्सॲपवर पत्रिका पाठवण्यास पसंती देत आहेत.याचाच फायदा घेत सायबर चोरट्यांनी एक अनोखी शक्कल लढवली आहे.लग्नपत्रिकेच्या फॉरमॅटमध्ये व्हायरसचा शिरकाव करून मोबाईलचा ताबा मिळवला जातो.त्याआधारे अवघ्या काही मिनिटात बँक खाती रिकामी केली जात आहेत.या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे.तसेच,अनोळखी व्यक्तीने व्हॉट्सॲपवर पाठवलेल्या लग्नपत्रिका ओपन न करण्याचे आवाहन सायबर विभागाकडून करण्यात आले आहे.
सायबर चोरटे लग्नपत्रिकेसारखी दिसणारी पीडीएफ फाईल पाठवतात.या फाईलला invitation असे नाव असते.त्यामुळे मोबाईलधारक संबंधित पीडीएफवर क्लिक करतात.क्लिक करताच मोबाईलमध्ये टॉरझोन व्हायरस घुसवला जातो.या व्हायरसच्या मदतीने चोरटे खातेधारकाचा मोबाईल हॅक करतात.मोबाईलमध्ये असलेल्या बँकेचे अँप,ऑनलाईन ट्रांजेक्शन ॲप यासह इतर गोपनीय माहितीच्या बँक खात्यातील रक्कम इतर अनोळखी खात्यावर परस्पर हस्तांतरित केली जाते. पीडीएफ लग्नपत्रिकेसह सायबर चोरटे एखादा व्हिडिओ आणि त्यासोबत लिंकही पाठवतात. विवाह मुहूर्त आणि विवाहस्थळ पाहण्यासाठी संबंधित लिंकवर क्लिक करण्याचा आग्रह केला जातो. संबंधित लिंकवर क्लिक केल्यानंतर मोबाईलचा ताबा सायबर चोरट्यांना मिळतो. एकदा मोबाईलचा ताबा मिळाला की,मोबाईलमध्ये असलेल्या गोपनीय माहितीच्या आधारे बँक खात्यातील रक्कम परस्पर इतर बँक खात्यावर वळवून घेतली जाते.त्यामुळे वेळीच सतर्कता बाळगणे आवश्यक आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विधान परिषद निवडणूक; घरबसल्या मोबाईलवर तपासा तुमचे मतदार यादीतील नाव..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक उद्या,शुक्रवार २३ ऑक्टोंबर रोजी होणार असून येत्या २७ ऑक्टोंबर रोजी मतमोजणी होणार आहे.त्यानुसार,मतदारांची नावे...

पदवीधर निवडणुकीसाठी गडचिरोली जिल्ह्यात २६ केंद्रांवर मतदान; १३ हजार ६०८ मतदारांची नोंदणी.. -चार तालुक्यांतील मतदानाच्या वेळेत बदल..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उद्या,शुक्रवार २३ ऑक्टोंबर रोजी गडचिरोली जिल्ह्यातील २६ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे.जिल्ह्यात १३...

प्रचाराच्या तोफा थंडावल्या; उद्याला विधान परिषद निवडणूक मतदान..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा काल बुधवारच्या सायंकाळी थंडावल्या असून उद्या,शुक्रवार २३ ऑक्टोंबर रोजी मतदान होणार आहे.नागपूर पदवीधर...

वाघाचा हल्ला; शेतकरी गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यांचे सत्र संपता- संपेना,असे चित्र निर्माण झाले आहे.जंगल परिसरात गेलेल्यांना वाघोबा तर सोडतच नाही.अश्यातच वाघ आता चक्क शेतावर जाणाऱ्या शेतकऱ्यांचाही...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!