Saturday, September 5, 2026
Homeगडचिरोलीसावधान..! वृद्ध निराधार महिलेच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत १० हजारांना गंडा... - कोरची...

सावधान..! वृद्ध निराधार महिलेच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत १० हजारांना गंडा… – कोरची तालुक्यातील घटना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्याच्या कोरची तालुक्यात नुकताच  एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.दोन अज्ञात भामट्यांनी एका वृद्ध निराधार महिलेच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत हाताच्या बोटाचे ठसे घेऊन १० हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आल्याने कोरची तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,कोरची तालुक्यातील ग्राम साल्हे येथील कमलीबाई सियाराम कल्लो वय ६५ वर्षे या वृद्ध निराधार महिलेच्या घरी दोन अज्ञात इसम गेले व तिच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत ‘आम्ही आयुष्यमान भारत योजना कार्यान्वित करण्यासाठी
कुरखेडा उपविभागीय अधिकारी कार्यालय(SDM) येथून आलेलो असून शासनाचे एजंट आहोत’; ‘आम्ही तुमचे आयुष्यमान कार्ड अपडेट करून देतो’ असे सदर वृध्द महिलेस सांगून आधार कार्ड तसेच बँकेचे पासबुक घेऊन महिलेचे बायोमेट्रिक (biometric) पद्धतीने हाताच्या बोटाचे ठसे (thumb impression) घेतले व निघून गेले.काही अवधीनंतर सदर महिलेच्या खात्यातून १० हजार रुपये काढण्यात आल्याचा मॅसेज आल्याने सदर प्रकार उघडकीस आला.त्यानुसार वृध्द महिलेने कोरची पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली आहे.पोलिसांनी अज्ञात भामट्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
हल्ली ऑनलाईन फसवणुकीचे वेगवेगळे प्रकार चोरटे वापरत असून चोरट्यांनी आता ग्रामीण भागातील अज्ञान व्यक्तींचा गैरफायदा घेण्याची नवी शक्कल लढविल्याचे सदर प्रकारावरून दिसून येत आहे.त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी; असे आवाहन कोरेची पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सतर्कता बाळगा..! नुकसानभरपाईच्या बहाण्याने शेतकऱ्यांकडून घेतले आधार कार्ड,पॅन कार्ड आणि सातबारे उतारे.. – अन् उचलले ७३ कोटींहून अधिकचे कर्ज..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-भोळ्या-भाबड्या,गरीब आणि अल्पशिक्षित शेतकऱ्यांना सरकारी योजनेअंतर्गत दरवर्षी दहा हजारांची नुकसाभरपाईची मदत मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांची कागदपत्रे मिळवली आणि त्यांच्याच नावावर...

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!