Thursday, September 3, 2026
Homeगडचिरोलीसावधान..! गडचिरोली शहरानजीक दोन हत्तींची एंट्री; आज पहाटे दर्शन..

सावधान..! गडचिरोली शहरानजीक दोन हत्तींची एंट्री; आज पहाटे दर्शन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-गडचिरोली वनविभागाच्या परिसरातून आज,रविवार २५ मे रोजी पहाटे २ वाजताच्या सुमारास दोन तरुण हत्तींनी शहरात प्रवेश केल्याचे आढळून आले.सदर माहिती वनविभागाला मिळताच संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ जलद प्रतिसाद दल नेमून त्यांच्या मदतीने हत्तींना शहरातून जंगलाकडे जाण्यासाठी मार्ग खुले करण्यात आले.त्यानंतर हत्ती सुरक्षित शहरातून बाहेर पडले असून सदर हत्तींवर रेस्पॉन्स टीम सतत पाळत करीत आहे व हत्तींच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवले जात आहे.
हत्तींच्या उपस्थितीमुळे एका दुकानास किरकोळ नुकसान झाल्याची नोंद वनविभागाने घेतली असून, या घटनेचा तपास सुरू आहे.सद्यस्थितीत रेस्क्यू टीम घटनास्थळी कार्यरत आहे व हत्ती सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात परत जातील यासाठी उपाययोजना सुरू आहेत.
सध्या इंदिरानगर,पोटेगाव रोड,धानोरा रोड व इतर भागांतील नागरिकांना आवश्यक ती दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.नागरिकांनी हत्ती आढळल्यास त्यांचा पाठलाग न करता अथवा फोटो काढण्याचा प्रयत्न न करता वनविभागाच्या १९२६ या टोल फ्री क्रमांकावर त्वरित माहिती द्यावी,तसेच कोणत्याही प्रकारची अफवा पसरवू नये.विशेषतः रात्रीच्या वेळेस शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे व सतर्क राहावे,असे आवाहन उपवनसंरक्षक मिलीश शर्मा यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम गहाणे यांना आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर.. -उच्च शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील महाविद्यालयीन,विद्यापीठ, अभियांत्रिकी व कला शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या प्राचार्य व शिक्षकांचा यथोचित गौरव करण्याच्या उद्देशाने दरवर्षी “डॉ.जे.पी.नाईक आदर्श...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!