Monday, July 13, 2026
Homeकुरखेडासार्वजनिक खेळाच्या मैदानात सोई-सुविधा उपलब्ध करून द्या.. - कुरखेडा शहर विचार मंचाच्या...

सार्वजनिक खेळाच्या मैदानात सोई-सुविधा उपलब्ध करून द्या.. – कुरखेडा शहर विचार मंचाच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांना निवेदन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कुरखेडा(गडचिरोली):-शहराच्या उत्तर दिशेला(जूनी पटाची दान)असलेल्या खेळाच्या मैदानावर सोई-सुविधांचा अभाव असल्याने पोलीस भरती व सैन्य भरतीची भरतीपूर्व तयारी करणाऱ्या उमेदवारांना, खेळाडूंना तसेच सकाळ-संध्याकाळच्या सुमारास फेरफटका मारणाऱ्या नागरिकांना कमालीच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.त्यामुळे कुरखेडा नगरपंचायत प्रशासनाने खेळाच्या मैदानावर आवश्यक त्या सोई-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात,अश्या मागणीचे निवेदन कुरखेडा शहर विचार मंचाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने मुख्याधिकारी यांना देण्यात आले.
शहराचे एकमेव खेळाचे मैदान असलेल्या जुन्या पटाच्या दानिवर एका बाजूला ओपन जीम निर्माण करण्यात आले आहे.मात्र,येथे आवश्यक व्यायाम साहित्याचा तुटवडा आहे.त्यातच बरेचसे साहित्य जुने झाल्याने काही प्रमाणात मोडकळीस आलेले आहेत.त्यामुळे या ठिकाणी अद्ययावत व दर्जेदार पुरेशा प्रमाणात व्यायाम साहित्य उपलब्ध करून द्या,तसेच येथे महिला व पुरुषांकरीता स्वतंत्र शौचालयाचे बांधकाम,बसण्याकरीता पुरेशा प्रमाणात बाके,स्वच्छ पीण्याच्या पाण्याची व्यवस्था, ओपन जीम परीसरात गट्टू लावत जागा समतल करणे आदि सोई-सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी शहर विचार मंचाच्या  वतीने निवेदनात करण्यात आली आहे. निवेदन सादर करतेवेळी कुरखेडा शहर विचार मंचाचे अध्यक्ष माधवदास निरंकारी,माजी नगराध्यक्ष रविन्द्र गोटेफोडे, प्रा.डॉ.दशरथ आदे,राम लांजेवार,माजी न.पं.सभापती पूंडलीक देशमुख,नगरसेवक सागर निरंकारी,ॲड.उमेश वालदे,पत्रकार सिराज पठाण, पूष्पराज रहागंडाले,प्रा.कीशोर खोपे,राजेश उईके, प्रा.विनोद नागपूरकर,आसिफ शेख,जावेद शेख यांचेसह शहर विचार मंचाचे बहुसंख्य सदस्य उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

आता मार्केटमध्ये येणार दहा किलो वजनाचा गॅस सिलेंडर..

उद्रेक न्युज वृत्त:-बऱ्याच ठिकाणी जागेचा अभाव, वजनी सिलेंडर तसेच वजनानुसार वाढणारी रक्कम सर्वसामान्यांना न झेपावणारी असते.विशेषतः लहान व्यावसायिक,हॉटेल चालक आणि रस्त्यावरील विक्रेते. यासाठी सरकारी...

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!