Monday, August 31, 2026
Homeगडचिरोलीसहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल दोन दिवसीय गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर..

सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल दोन दिवसीय गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय आणि कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,शुक्रवार २६ डिसेंबर आणि शनिवार २७ डिसेंबर २०२५ रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.या दौऱ्यात ते विकास कामांचा आढावा आणि विविध जिल्हास्तरीय उपक्रमांना भेटी देणार आहेत.त्यांच्या दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. उद्या शुक्रवार दुपारी १२.३० वाजता राज्यमंत्री ॲड.जयस्वाल यांचे गडचिरोलीत आगमन झाल्यानंतर ते मौजा कनेरी येथील शंकरपट मैदानावर आयोजित जिल्हास्तरीय पशु प्रदर्शनास भेट देतील.त्यानंतर दुपारी १.३० वाजता जिल्हा परिषद गडचिरोली येथे जिल्हास्तरीय सरस विक्री व प्रदर्शनीची पाहणी करून दुपारी २.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विविध विषयांवर आढावा बैठक घेतील. सायंकाळी ते जिल्हा परिषदेच्या शालेय बालक्रिडा व सांस्कृतिक कार्यक्रमाला उपस्थित राहतील आणि रात्री ८.०० वाजता वाकडी येथील शाळेत आयोजित इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या विभागीय सांस्कृतिक व क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करतील.
शनिवारी २७ डिसेंबर रोजी राज्यमंत्री ॲड.जयस्वाल सकाळी ९.३० वाजता  मौजा चुरचुरा येथे ते संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. तद्नंतर आरमोरी तालुक्यातील इंजेवारी आणि देऊळगाव या गावांना भेट देऊन वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांचे भेट देतील. दुपारी १२.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा वार्षिक योजनेबाबत संबंधित यंत्रणांशी सविस्तर चर्चा करतील आणि सोयीनुसार विश्रामगृह येथे आगमन व राखीव.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

तब्बल २५० हून अधिक गावांचा ‘कुष्ठभयमुक्त व भेदभावमुक्त ग्राम’ संकल्प.. – कुष्ठांतेयांच्या प्रतिष्ठेसाठी ग्रामसभेत सर्वानुमते ठराव पारित..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-कुष्ठरोगाविषयी असलेली भीती,गैरसमज, कलंक आणि सामाजिक भेदभाव दूर करून कुष्ठांतेयांना सन्मानाने व प्रतिष्ठेने जगता यावे,या उद्देशाने चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया,पालघर व नंदुरबार जिल्ह्यात...

विकृत मानसिकतेचा कळस; चिमुकल्या मुलीसोबत २५ वर्षीय तरुणाचे गैरवर्तन..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काही विकृत मानसिकतेचा कळस गाठलेल्या पुरुषांना कायद्याचा धाक उरलेला नसल्याचे दिसून येत आहे.भोळ्या-भाबड्या चिमुकल्या मुलींना फुस लावून जाळ्यात ओढत कुठे अत्याचार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!