- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :-शेतात कामे करीत असतांना साप चावल्याने एका महिलेसह एका पुरुषाचा मृत्यू झाल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यात उघडकीस आली आहे.देवरी तालुक्याच्या लेंडीजोब-महाका गावातील ५५ वर्षीय लक्ष्मण आसाराम सिडको हे मंगळवारी शेतात काम करीत असतांना त्यांना दांड्या काळीच्या सापाने चावा घेतला.तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र,दुसऱ्याच दिवशी त्यांचा चिचगडच्या रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
दुसऱ्या घटनेत,मोहगाव येथील ५० वर्षीय देविंद्रा राऊत ही काल सोमवारी सकाळी स्वतःच्या शेतातील निंदणाचे काम करण्यासाठी गेली होती.काम करीत असतांनाच तिला पायाला काहीतरी चावल्याचा भास झाला.तिने शेतात काम करीत असलेल्या मजुरांना ही बाब सांगितली असता त्यांनी लगेच याची माहिती तिच्या कुटुंबीयांना तसेच गावकऱ्यांना दिली.कुटुंबीय व आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी लगेच त्यांच्या शेतात पोहोचत देविंद्रा यांना देवरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र,उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.दोन्ही शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळावी,अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.दोन्ही घटनांची चिचगड पोलिसांनी नोंद घेतली आहे.
- Advertisement -

