Friday, September 11, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तपावसाने दाणादाण; मुख्यमंत्री अलर्ट मोडवर.. - जिल्हाधिकाऱ्यांना दिले मदतीचे सर्व अधिकार; थेट...

पावसाने दाणादाण; मुख्यमंत्री अलर्ट मोडवर.. – जिल्हाधिकाऱ्यांना दिले मदतीचे सर्व अधिकार; थेट पैसे देण्याचेही अधिकार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-राज्यात मुसळधार पावसाने सर्वत्र दाणादाण होऊन शेतीचे नुकसान,घरांची पडझड,जनावरे तसेच नैसर्गिक आपत्तीत मृत्यू झाल्याच्या मोठ्या घटना घडल्या असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अलर्ट मोडवर येत त्यांनी राज्यातील पूरपरिस्थितीचा आढावा घेतला.राज्यात तब्बल १४ लाख एकर पिकांचे नुकसान झाले असल्याचे  सांगितले.राज्यात अनेक भागांमध्ये अतिवृष्टी झाली असल्याचे देखील त्यांनी सांगितले. अश्यातच राज्यातील परिस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरु आहे.मुंबईतील मिठी नदी धोका पातळीवर गेली असल्यामुळे सुरुवातीच्या काळात अनेकांना वाचवण्यासाठी प्रयत्न करावे लागले असल्याचेही त्यांनी सांगितले.अलीकडच्या काळात राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवला जात असल्याने सध्या स्थितीत ज्या जिल्ह्यात शेती,घरे,जनावरे व इतर नुकसान किंवा एखाद्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय,अश्यांना मदत करण्याचे सर्व अधिकार हे त्या त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.तसेच एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे जिल्हाधिकारी त्यांना तात्काळ मदत करू शकतात.त्यांना थेट पैसे देण्याचेही अधिकार दिलेले आहे.त्यामुळे तिथे अडचण येणार नाही.शेती संदर्भात देखील पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत,असे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.मुंबईतील नागरिकांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जास्तीत जास्त लोकांना वर्क फॉर्म होम देण्याचे निर्देश राज्य सरकारच्या वतीने देण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. आतापर्यंतची परिस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात असली तरी अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात पाऊस आणि टायफाइड असल्यामुळे उपाययोजना कराव्या लागणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धरणात बुडालेल्या तरुण शेतकऱ्याचा सापडला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बैल पोळा सणाच्या एक दिवसापूर्वी धरण परिसरात बैल धुण्यासाठी गेलेला तरुण शेतकरी बुडाल्याची घटना काल,बुधवार ९ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या...

सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन,वारसा हक्क,पदोन्नती व निवासाच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करा- राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागरिकांचे आरोग्य आणि सार्वजनिक स्वच्छता राखण्यात सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.त्यामुळे त्यांच्या वेतन,सेवा,आरोग्य, निवास व आर्थिक सुरक्षिततेशी संबंधित प्रलंबित प्रश्नांचा...

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत विद्यार्थ्यांमध्ये उत्तम मूल्यसंस्कार रुजविणे काळाची गरज-शिक्षणमंत्री दादाजी भुसे – ‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत आज विविध शाळांना प्रत्यक्ष भेटी.. – पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शाळेत केवळ पुस्तकी ज्ञान देणे पुरेसे नसून गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच भावी पिढीवर राष्ट्रभक्तीचे आणि उत्तम मूल्यांचे संस्कार रुजवणे गरजेचे आहे.गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातही...

अजब लाचेची गजब कहाणी..! दोन्ही हातांच्या दहा बोटांचा इशारा करून मागितली १० हजाराची लाच.. – पोलीस उपनिरीक्षक व पोलीस अंमलदार एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  छत्रपती संभाजीनगर :-राज्याच्या विविध भागात सरळ-सरळ तोंडी बोलणी करून अनेकजण लाच घेतांना व एसीबीच्या जाळ्यात अडकतांना दिसून येतात.पण, नुकतेच छत्रपती संभाजीनगर(पूर्वीचे औरंगाबाद)शहरात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!