- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :-गावालगत असलेल्या तलावात गोरे(बैल) धुण्यासाठी गेलेल्या सातव्या वर्गात शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज,रविवार २ फेब्रुवारीला दुपारी ४ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.दुर्गेश धनंजय पातोळे वय १३ वर्षे,व रितीक रुपराम पातोळे वय १३ वर्षे दोघेही रा.अरततोंडी,ता.अर्जुनी-मोरगाव असे तलावात बुडून मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत.सदर मुले ही सख्खे चुलत भाऊ असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,दोघेही चुलत भाऊ आज रविवार असल्याने घरी असलेले गोरे(बैल) धुण्यासाठी गावालगतच्या पिंपळगाव-अरततोंडी मार्गावर अगदी अरततोंडी गावाला लागूनच असलेल्या तलावा नजिक गेले होते.गोरे धुत असतांना दोघांनाही पाण्यात पोहण्याचा मोह आवरेनासा झाल्याने पाण्यात उतरले. पाण्यात पोहण्यासाठी उतरताच तलावातील पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला.सदर घटना परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली.घटनेची माहिती अर्जुनी-मोरगाव पोलीस प्रशासनास देताच ठाण्याचे ठाणेदार कमलेश सोनटक्के पथकासह घटनास्थळी दाखल होत दोन्ही मृतदेह पाण्यातून बाहेर काढत ग्रामीण रुग्णालय अर्जुनी-मोरगाव याठिकाणी शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले.घटनेचा पुढील तपास ठाणेदार कमलेश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली अर्जुनी-मोरगाव पोलीस प्रशासन करीत आहे.
- Advertisement -

