Thursday, September 3, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तसर्वसामान्य प्रवाशांना मोठा दिलासा; अखेर एसटीची तिकिट दरवाढ मागे..!

सर्वसामान्य प्रवाशांना मोठा दिलासा; अखेर एसटीची तिकिट दरवाढ मागे..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यात पावसाने अक्षरशः थैमान घालून सर्वसामान्य नागरिकांची घरे,जनावरे,जीवनावश्यक वस्तू तसेच शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करून शेतकऱ्यांपुढे मोठे संकट ओढवले आहे.आधीच पावसामुळे होत्याचे नव्हते झाल्याने दिवाळीसारखा मोठा सण कसा साजरा करायचा? या विवंचनेत असतांनाच सरकारने सर्वसामान्यांना शॉक देत  एसटीची दरवाढ करण्याचा निर्णय घेतला होता.शिवनेरी व शिवाई या दोन बसेस सोडता इतर सर्व एसटी बसेससाठी १५ ऑक्टोंबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत १० टक्के दरवाढ लागू करण्यात आली होती.दरवाढ झाल्यामुळे सर्वत्र तीव्र पडसाद उमटले होते.त्यामुळे सदरची दरवाढ मागे घेतली जावी, अशी मागणी केली जात होती.या पार्श्वभूमीवर राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज,बुधवार १ ऑक्टोंबरला एसटीच्या तिकीटाची केलेली हंगामी दरवाढ रद्द करण्याची घोषणा केली आहे.दरम्यान,जानेवारी २०२५ मध्ये एसटी महामंडळाने १४.९५ टक्के दरवाढ लागू केली होती.हे दर एसटीच्या सर्व सेवांसाठी लागू करण्यात आले होते.अश्यातच ऐन सणासुदीच्या काळात वातानुकूलित बसेस सोडून इतर बसेसवर दरवाढ करण्याचा निर्णय चुकीचा असल्याने सर्वच स्तरावरून टीकेची तोफ डागण्यात आली होती.त्यानुसार आता सदरची दरवाढ ही मागे घेण्यात आली असून यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!