Monday, August 24, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तसरपंच आणि संपूर्ण ग्रामपंचायत बॉडीलाच प्रशासक नेमा; अन्यथा आंदोलन.. - अखिल भारतीय...

सरपंच आणि संपूर्ण ग्रामपंचायत बॉडीलाच प्रशासक नेमा; अन्यथा आंदोलन.. – अखिल भारतीय सरपंच परिषदेची मागणी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-सध्या महाराष्ट्र राज्यात दोन हजारांहून अधिक ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात आले असून, येत्या फेब्रुवारी महिन्यात आणखी १४ हजारांहून अधिक ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे.त्यातच,स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अद्याप झालेल्या नसल्याने आगामी काळात मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायती प्रशासकांच्या ताब्यात जाण्याची शक्यता आहे.या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतींवर सरपंचांनाच प्रशासक म्हणून नेमण्यात यावे,अशी मागणी अखिल भारतीय सरपंच परिषदेकडून मुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे करण्यात आली आहे.
कोरोना काळापासून आतापर्यंत ज्या-ज्या वेळेला ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात आले,त्या बहुतांश गावांचा विकास ठप्प झाल्याचे दिसून आले आहे.सरपंच व ग्रामस्थांच्या पुढाकाराने सुरू असलेले नावीन्यपूर्ण उपक्रम,विकासकामे व योजना बंद पडल्याचे चित्र अनेक गावांत दिसत आहे.त्यामुळे सरपंच आणि संपूर्ण ग्रामपंचायत बॉडीच प्रशासक म्हणून नेमली जावी, यासाठी कायद्यात बदल करून राज्यपालांचा अध्यादेश काढावा,अशी मागणी परिषदेकडून करण्यात आली आहे.
सध्या राज्यात महायुती सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबविण्यात येत असून,या योजनेला ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. ग्रामपंचायतींच्या माध्यमातून स्मशानभूमी,शाळा, ग्रामपंचायत कार्यालये आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू आहेत. मात्र,सरपंच व संपूर्ण ग्रामपंचायत अस्तित्वात नसल्यास या योजनांना खीळ बसण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.इतर राज्यांमध्येही अशीच परिस्थिती निर्माण झाल्यानंतर मध्य प्रदेश,उत्तराखंड,झारखंड आणि राजस्थान या राज्यांनी सरपंच व संपूर्ण ग्रामपंचायत बॉडीला प्रशासक म्हणून नेमण्याचा निर्णय घेतला आहे.राजस्थान सरकारचा याबाबतचा अध्यादेशही उपलब्ध असल्याचे परिषदेकडून सांगण्यात आले आहे.
  • जयंत पाटील,अध्यक्ष,अखिल भारतीय सरपंच परिषद👇
महायुती सरकारने यापूर्वी तुकडेबंदी कायदा,पाणंद रस्ते,मोजणी फी माफी यांसारखे लोकहिताचे निर्णय घेतले आहेत.त्याच धर्तीवर ग्रामीण महाराष्ट्राच्या हितासाठी सरपंच व संपूर्ण ग्रामपंचायतीला प्रशासक म्हणून नेमण्याचा निर्णय घ्यावा,या निर्णयाकडे दुर्लक्ष झाल्यास अखिल भारतीय सरपंच परिषद रस्त्यावर उतरून आंदोलन करेल.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंज आदर्श महाविद्यालयात वाणिज्य विद्यार्थी अभ्यास मंडळाची स्थापना.. – विद्यार्थ्यांनी आत्मनिर्भर बनावे- प्रा.डॉ.निलेश हलामी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डाॅ.श्रीराम गहाणे यांच्या मार्गदर्शनात शैक्षणिक सत्र २०२६-२७ करिता वाणिज्य विद्यार्थी अभ्यास मंडळाची स्थापना...

धावत्या बसमधून खाली कोसळताच दुसऱ्या बसने चिरडले; तरुणीचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-पुण्यातील सिंहगड मार्गावरील माणिकबाग परिसरात आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली. खानापूर-स्वारगेट मार्गावरील धावत्या पुणे...

जोरदार पावसाचा फटका; वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता.. – वैनगंगा नदीकिनारी राहणाऱ्यांना सतर्क राहण्याचा सल्ला..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने धानासह अन्य खरीप पिकांच्या स्थितीबाबत शेतकऱ्यांची चिंता वाढली होती.अशा परिस्थितीत काल रविवारी झालेला पाऊस पिकांसाठी...

नैनपूरच्या विद्यार्थ्यांचा ‘सीमेवरील जवानांसाठी प्रेमाची राखी’ उपक्रम; जवानांना पाठवल्या राख्या..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा नैनपूर वार्ड येथे आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, राष्ट्रनिष्ठा,सेवाभाव आणि सामाजिक बांधिलकीची भावना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!