Monday, August 24, 2026
Homeनागपूरआयएएस अधिकारी असल्याचा कुठलाही आविर्भाव न बाळगता पंगतीत बसून केले जेवण..

आयएएस अधिकारी असल्याचा कुठलाही आविर्भाव न बाळगता पंगतीत बसून केले जेवण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-शासकीय कामे वा जनतेची कामे करण्यासाठी एखाद्या मोठ्या पदावर विराजमान झालेली व्यक्ती ही साहेब कधीच नसते.यात आयएएस अधिकारी असो, खासदार असो,आमदार असो वा एसडीएम,तहसीलदार वा इतर हे तुमची-आमची कार्यालयीन तसेच जनतेची कामे करण्यासाठी असून शासकीय अधिकारी,कर्मचारी हे जनतेचे ‘लोकसेवक’ तर आमदार,खासदार हे ‘लोकप्रतिनिधी’ आहेत.आपण त्यांना मान-सन्मान म्हणून ‘साहेब’ वा ‘सर’ म्हणून संबोधत असतो.अश्यातच काहीजण स्वतःला मोठे साहेब समजून घेण्यात धन्यता मानत असतात.मात्र,याला अपवाद आणि आयएएस अधिकारी असल्याचा कुठलाही आविर्भाव मनात न बाळगता नागपूर ग्रामीण जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेला भेट देत तेथील विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनाच्या पंगतीत बसून स्वतः जेवण केले व सोबत असलेल्या सहकाऱ्यांनाही जेवायला सांगितले.त्यांच्या या कृतीतून त्यांनी “अधिकारी” नव्हे तर “आपलाच माणूस” ही भावना विद्यार्थ्यांमध्ये व ग्रामस्थांमध्ये निर्माण केली.
तीन दिवसांपूर्वी म्हणजेच ३० डिसेंबर रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी नागपूर जिल्ह्याच्या मौदा तालुक्यातील ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ चा आढावा घेतला आणि विविध शाळांना भेटी दिल्या.या भेटीदरम्यान त्यांनी शाळेतील भौतिक सुविधा,शैक्षणिक व डिजिटल साधने, स्वच्छतागृहे,हॅण्डवॉश स्टेशन तसेच मध्यान्ह भोजन योजनेची सखोल पाहणी केली.शाळेच्या परसबागेत पिकविण्यात येणाऱ्या भाजीपाल्याचा माध्यान्ह भोजनात होणारा वापर,स्वयंपाकगृहाची स्वच्छता,भांड्यांची निगा व धान्यसाठ्याची तपासणी केली.दरम्यान,त्यांनी आयएएस असल्याचा कुठलाही आविर्भाव न ठेवता सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी खाली चटईवर टाकलेल्या पंगतीत बसून जेवण केले.यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी कपिलनाथ कलोडे,पंचायत समिती मौदाचे गटविकास अधिकारी डॉ.महेश बेहेकर उपस्थित होते. विद्यार्थ्यांना दिले जाणारे पिण्याचे पाणी त्यांनी स्वतः पिऊन त्याची गुणवत्ता तपासली.यावेळी शाळेच्या शिक्षिका व केंद्रप्रमुख जुगलकिशोर बोरकर यांनी पंगतीचे वाढण केले.स्वयंपाक करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक करीत महामुनी यांनी मुख्याध्यापिका सुवर्णा ठोंबरे यांच्याकडून चव रजिस्टर तपासून त्यावर चवदार अन्न,असा शेरा लिहून स्वाक्षरी केली.त्यामुळे शाळेतील कर्मचारी व विद्यार्थ्यांमध्ये आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.यानंतर त्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,मारोडी येथेही भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.मुख्याध्यापिका माधुरी चौधरी व शिक्षक महेंद्र हेडाऊ यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी हे अधिकार आणि प्रतिष्ठेपेक्षा माणुसकी,साधेपणा आणि संवेदनशीलतेला अधिक महत्त्व देणारे अधिकारी म्हणून ओळखले जातात.प्रशासकीय दौऱ्यावर असतांना त्यांच्या लोकाभिमुख कृतीतून त्याचा परिचय येतो.ग्रामीण भागातील लोकांशी संवाद साधून त्यांच्या प्रश्नांना समजून घेत थेट संवाद साधत असतात.हे विशेष.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंज आदर्श महाविद्यालयात वाणिज्य विद्यार्थी अभ्यास मंडळाची स्थापना.. – विद्यार्थ्यांनी आत्मनिर्भर बनावे- प्रा.डॉ.निलेश हलामी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डाॅ.श्रीराम गहाणे यांच्या मार्गदर्शनात शैक्षणिक सत्र २०२६-२७ करिता वाणिज्य विद्यार्थी अभ्यास मंडळाची स्थापना...

धावत्या बसमधून खाली कोसळताच दुसऱ्या बसने चिरडले; तरुणीचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-पुण्यातील सिंहगड मार्गावरील माणिकबाग परिसरात आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली. खानापूर-स्वारगेट मार्गावरील धावत्या पुणे...

जोरदार पावसाचा फटका; वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता.. – वैनगंगा नदीकिनारी राहणाऱ्यांना सतर्क राहण्याचा सल्ला..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने धानासह अन्य खरीप पिकांच्या स्थितीबाबत शेतकऱ्यांची चिंता वाढली होती.अशा परिस्थितीत काल रविवारी झालेला पाऊस पिकांसाठी...

नैनपूरच्या विद्यार्थ्यांचा ‘सीमेवरील जवानांसाठी प्रेमाची राखी’ उपक्रम; जवानांना पाठवल्या राख्या..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा नैनपूर वार्ड येथे आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, राष्ट्रनिष्ठा,सेवाभाव आणि सामाजिक बांधिलकीची भावना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!