Wednesday, July 29, 2026
Homeनागपूरसज्ञान अविवाहित मुलीलाही वडिलाकडून पोटगी मागण्याचा अधिकार- उच्च न्यायालय

सज्ञान अविवाहित मुलीलाही वडिलाकडून पोटगी मागण्याचा अधिकार- उच्च न्यायालय

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-हिंदू दत्तक व निर्वाह कायद्यामधील कलम २० अनुसार स्वतःचे पालनपोषण करण्यास असमर्थ असलेल्या सज्ञान अविवाहित मुलीलाही वडिलाला पोटगी मागण्याचा अधिकार आहे,असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फलके यांनी दिला.
२४ जानेवारी २०२४ रोजी अकोला कुटुंब न्यायालयाने एका सज्ञान अविवाहित मुलीला पाच हजार रुपये महिना पोटगी मंजूर केल्यामुळे वडिलाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.सीआरपीसी कलम १२५ अनुसार सज्ञान अविवाहित मुलगी पोटगी मिळण्यासाठी पात्र नाही,असा दावा वडिलाने केला होता.उच्च न्यायालयाने हा दावा लक्षात घेता मुलीचे हिंदू दत्तक व निर्वाह कायद्यांतर्गतचे अधिकारही स्पष्ट केले. सीआरपीसी कलम १२५ नुसार सज्ञान अविवाहित मुलगी तिला शारीरिक-मानसिक समस्या असेल तरच पोटगीसाठी पात्र आहे.सामान्य सज्ञान अविवाहित मुलीला या कायद्यांतर्गत पोटगी दिली जाऊ शकत नाही.परंतु,हिंदू दत्तक व निर्वाह कायद्यामधील कलम २० नुसार स्वतःचे पालनपोषण करण्यास असमर्थ असलेल्या सज्ञान अविवाहित मुलीला वडिलाकडून पोटगी मागण्याचा अधिकार आहे,असे उच्च न्यायालयाने सांगितले.प्रकरणातील मुलीचे आई-वडील कौटुंबिक वादामुळे वेगळे झाले आहेत.मुलगी आईसोबत राहत असून सध्या ती मुंबई येथे कायद्याचे शिक्षण घेत आहे. तिच्याकडे उत्पन्नाचे साधन नाही.त्यामुळे तिने कुटुंब न्यायालयात अर्ज करून वडिलाकडून पोटगी मागितली होती.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मुसळधार पावसाचा इशारा; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली/नागपूर :-भारतीय हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राने गडचिरोली जिल्ह्यासाठी उद्या,बुधवार २९ जुलै रोजी रेड अलर्ट तर ३० जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जारी...

उद्यापासून राज्याच्या विविध भागात वाढणार पावसाचा जोर; नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांत उद्या,बुधवार २९ जुलै ते ३१ जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज...

पुलाचा कठडा तोडून कालव्यात कोसळली कार; एकाचा जागीच मृत्यू,तर तिघेजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-मुलगा व सुनेसोबत नातवाच्या भेटीसाठी गेलेल्या एका वृद्धेची नातवाची भेट ही अखेरची ठरल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा-आमगाव मार्गावरील हरदोली गावाजवळील पुलाजवळ...

आता १० रुपये व २० रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार चलनात.. – जुन्या कागदी नोटा बंद होणार काय?

उद्रेक न्युज वृत्त :-कागदी नोटांचा वापर अनेक ठिकाणी केला जातो.विशेषतः भाजीपाला,प्रवास आणि दैनंदिन खरेदीत कागदी नोटांचा वापर सातत्याने होत असल्याने कागदी नोटा खूप लवकर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!