Tuesday, July 28, 2026
Homeसंपादकीयसंपादकीय….-'इथे' दोघेच मिळून घेतात टक्केवारी…..!

संपादकीय….-‘इथे’ दोघेच मिळून घेतात टक्केवारी…..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

मुख्य संपादक/सत्यवान रामटेके

संपादकीय :- सध्या स्थितीत ‘जो करील काम त्यांनाच मिळेल दाम’ असे असले तरीही ‘इथे’ दोघेच मिळून प्रत्येक कामासाठी केवळ स्वाक्षरी करण्याची २० ते २५ टक्के;  टक्केवारी घेऊन,खीचिक नरी दाताळ्या दाखवून बाकीच्यांना पळपुट्या घोड्याची सवारी करण्यास भाग पाडीत आहेत.स्वाक्षरी कर्त्यांना केवळ वारला घळघळ पैसा मिळतोय; असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.आजच्या घडीला कितीतरी जण स्वतःच्या खिशातील स्वतः पैसा खर्च करून कित्तेक काम आणीत असतात.अशातही काम आणण्यासाठी खालच्या स्तरापासून तर वरच्या स्तरापर्यंत अनेकांचे खिसे गरम केल्याशिवाय काम मिळत नसल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.मात्र सदर चर्चेचा भांडाफोड झाल्यास आम्हाला काम कसे मिळणार? त्यामुळे ‘झाकली मूठ सव्वा लाखाची; असे हल्ली चित्र निर्माण झाले आहे.अशातच सार्वजनिक हिताचे काम सुरू करावयास गेल्यास ‘तो’ वा ‘ती’ म्हणते की,माझी टक्केवारी किती?असे अनेकांच्या मुखातून वाणी निघू लागते.’जो देणार सर्वात जास्त टक्केवारी; तोच चढेल घोड्याची सवारी’ असे अनेक शासकीय कार्यालय तसेच इतर ठिकाणी हल्ली निदर्शनास येऊ लागले आहे.जास्तीत-जास्त टक्केवारी मिळाली नाही तर कामात विघ्न आल्याशिवाय राहणार नाही.एकदा सगळ्यांची टक्केवारी ठरली की,विघ्नहर्ता प्रसन्न झालाय; असे समजावे लागते.आणलेल्या कामांमध्ये काम सुरू करण्याच्या पूर्वी विघ्नहर्ता प्रसन्न झाल्यास अशा कामांमध्ये कुणीही लक्ष घालणार नाही; त्यामुळे ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ होण्यास सुरुवात होते.नंतर मुर्खांनी कितीही डोकावून पाहिले तरीही अशांना कुणीही विचारत नाही.एकदा घोडा मैदानी रेस मध्ये उतरला की, तिगळीक-तिगळीक सुरू होऊन कुठला तरी थांबा ठरविला जातो.थांबा आला की,इथे’ दोघेच मिळून घेतात टक्केवारी अन् ‘त्यांना’ दाखवितात पळपुट्या घोड्याची सवारी….असे समजावे लागते; उर्वरित ‘बे अक्ली  शिकून अळाणी’ झाल्या सारखे वाटतात…..!  टक्केवारी घेणाऱ्या त्या दोघांना जाब विचारला पाहिजे; काम कुठून आला, अंदाज पत्रकात तरतूद काय? किती रक्कम आहे, कोणत्या बाबींवर किती खर्च होणार? वा इतर असे अनेक प्रश्न विचारणे हे सर्वसामान्य नागरिक तसेच ग्रामस्थांचे काम आहे.मात्र याचे कुणाला कसलेही देणे घेणे नसल्याचे दिसून येत आहे.त्यामुळेच झकास ऐवजी भकास कामे होतांना दिसून येतात व दोघेच मिळून कितीतरी टक्केवारी घेतात.यावर आळा घालणे केवळ तुमच्या-आमच्याच हातात असल्याने दुर्लक्ष करून चालणार नाही.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता १० रुपये व २० रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार चलनात.. – जुन्या कागदी नोटा बंद होणार काय?

उद्रेक न्युज वृत्त :-कागदी नोटांचा वापर अनेक ठिकाणी केला जातो.विशेषतः भाजीपाला,प्रवास आणि दैनंदिन खरेदीत कागदी नोटांचा वापर सातत्याने होत असल्याने कागदी नोटा खूप लवकर...

हिंदू खाटीक समाजातील लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी कर्ज व अनुदान योजनांचा लाभ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या उपकंपनी असलेल्या हिंदू खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळ मार्फत हिंदू खाटीक समाजातील पात्र लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी विविध...

कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र शासनाच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत विविध जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर करण्यात आल्याने कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी...

बापरे..! तब्बल १९९ किलो गाजांची वाहतूक; दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली पोलिसांनी गांजाची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करून तब्बल १९९.५६० किलो ग्रॅम वजनाच्या गाजांची वाहतूक करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या....

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!