- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-काही दिवसांपूर्वीच हवामान विभागाकडून विदर्भातील काही ठिकाणी मेघ गघर्जना तसेच विजांचे कडकडाटसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला होता.त्यानुसार चंद्रपूर जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यात बुधवारपासून मेघगर्जनेसह रिमझिम पाऊस सुरु आहे.पाऊस पडत असल्याने शेतीच्या कामांना गती आली आहे.त्यामुळे शेतकरी वर्ग शेतावर जाऊन कामे करतांना दिसून येत आहेत.अश्यातच शेतात कामे करतांना वा परतीच्या वाटेवर असतांनाच अचानकपणे अंगावर वीज कोसळल्याने सलग दोन दिवसांत दोघांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.बुधवारी तळोधी परिसरात वीज कोसळल्याने सावर्ला येथे एक जण ठार,तर एक जखमी झाल्याची घटना ताजी असतांनाच परत काल गुरुवारी नागभीड तालुक्यातील किटाळी (बोरमाळा)येथील शेत शिवारात रोवणीसाठी धान पऱ्हेच्या पेंढ्या पसरवित असतांना अंगावर वीज कोसळल्याने शेतमजुराचा मृत्यू झाला.अविनाश चंद्रभान उईके वय २५ वर्षे, रा. मेंढा माल असे मृताचे नाव असून तो किटाळी येथे नातेवाईकाकडे राहत होता.
- Advertisement -

