Thursday, September 3, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तशेतकऱ्यांचे कर्ज फेडण्यासाठी एकेकाळी आईने दागिने काढले होते विकायला.. -अन् आता तिच्याच...

शेतकऱ्यांचे कर्ज फेडण्यासाठी एकेकाळी आईने दागिने काढले होते विकायला.. -अन् आता तिच्याच पुण्यतिथीला अख्ख्या गावातील शेतकऱ्यांचे कर्ज फेडले मुलाने..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-तुमच्याकडे अरबो,खरबो रुपये असून कोणत्या कामाचे; ज्याचा उपयोग मानवतेसाठी होत नसेल तर..एकेकाळी ज्या माऊलीच्या मनात गावातील शेतकऱ्यांप्रती दयेचा पाझर फुटलेला होता; त्याचे पांग फेडण्याची आता हीच खरी वेळ असल्याचे म्हणत तिच्या मुलाने पुण्यतिथी दिनी अख्ख्या गावातील शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज फेडून मानवतेचे दर्शन घडवले आहे.सदरची घटना ही गुजरातच्या अमरेली जिल्ह्यातील सावरकुंडला तहसीलमधील जिरा गावातील आहे.जिरा गावातील रहिवासी बाबूभाई जिरावाला हे एक व्यवसायिक आहेत. त्यांच्या गावात १९९५ पासून जिरा सेवा सहकारी मंडळाबाबत एक मोठा वाद सुरू होता.त्यावेळेस समितीच्या तत्कालीन प्रशासकांनी शेतकऱ्यांच्या नावावर फसवे कर्जे काढली होती.गेल्या काही वर्षांत कर्जात प्रचंड वाढ झाली होती.यामुळे गावातील शेतकऱ्यांना सरकारी मदत,कर्ज आणि इतर लाभांपासून वंचित ठेवण्यात आले होते.बँकांनी गावातील शेतकऱ्यांना कर्ज देण्यास नकार दिला होता.कर्जाचे ओझे वाढू लागल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले होते.कर्जामुळे शेत जमिनीचे विभाजन करणेही अशक्य होते.त्यावेळेस बाबूभाई जिरावाला यांच्या आईला गावातील शेतकऱ्यांची चिंता वाटू लागली.त्यामुळे त्यांनी गावातील शेतकऱ्यांचे कर्ज फेडण्यासाठी दागिने विकायला काढले होते.मात्र,कर्जाची रक्कम एवढी मोठी होती की,दागिने विकून संपूर्ण शेतकऱ्यांचे कर्ज फेडणे शक्य नव्हते.नंतर काही कालावधीत त्या मृत पावल्या.गावातील शेतकऱ्यांसाठी त्याकाळी आईने घेतलेला निर्णय बाबूभाई जिरावाला यांच्या स्मरणात राहिला.नुकतेच बाबूभाई आणि त्यांचा भाऊ बँक अधिकाऱ्यांना भेटले आणि इच्छा व्यक्त केली.बँकेने कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र देण्याचे ठरले.जिरा गावातील एकूण २९० शेतकऱ्यांवर एकूण ८९ लाख ८९ हजार २०९ रुपयांचे कर्ज होते.त्यानुसार,बाबूभाई जिरावाला यांनी त्यांच्या आईच्या पुण्यतिथीनिमित्त गावातील २९० शेतकऱ्यांचे गेल्या ३० वर्षांपासूनचे कर्ज फेडले  आणि बँकेकडून कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र मिळवले. या प्रसंगाने जिरा गावातील वातावरण भावनिक झाले. प्रसंगी बाबूभाई जिरावाला यांनी आमच्या आईची इच्छा पूर्ण केल्याबद्दल आणि तिला खरी श्रद्धांजली वाहिल्याबद्दल मी आणि माझे कुटुंब आनंदी आहोत; असे म्हणत संपूर्ण गाव कर्जमुक्त केले.शतकानुशतके जुने ओझे दूर झाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.संपत्तीचा वापर जेव्हा मानवतेसाठी केला जातो तेव्हा त्याचे मूल्य अब्जावधी रुपयांपेक्षा अधिक असते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम गहाणे यांना आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर.. -उच्च शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील महाविद्यालयीन,विद्यापीठ, अभियांत्रिकी व कला शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या प्राचार्य व शिक्षकांचा यथोचित गौरव करण्याच्या उद्देशाने दरवर्षी “डॉ.जे.पी.नाईक आदर्श...

आजपासून पुढील पाच दिवस पावसाळी वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील अनेक जिल्ह्यात रिमझिम पाऊस व उघडीप सुरू आहे. काल बुधवारी भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ५ मिमी पावसाच्या...

आज पहाटे गडचिरोली जिल्ह्यात ३.६ तीव्रतेचा भूकंप..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास ३.६ तीव्रतेच्या भूकंपाची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!