Wednesday, September 2, 2026
Homeगडचिरोलीअनुदान व बीजभांडवल योजने अंतर्गत कर्ज मागणीचे अर्ज सुरू.. - शासनाकडून ६५...

अनुदान व बीजभांडवल योजने अंतर्गत कर्ज मागणीचे अर्ज सुरू.. – शासनाकडून ६५ लाभार्थ्यांचे उद्दिष्ट प्राप्त..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित,जिल्हा कार्यालय गडचिरोलीतर्फे सन २०२५-२६ या चालू आर्थिक वर्षासाठी शासनाकडून मंजूर झालेल्या अनुदान योजनेअंतर्गत २५ व बीजभांडवल योजनेअंतर्गत ४० लाभार्थ्यांचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे.ही योजना मांग, मातंग,मादगी,मादिगा समाज तसेच त्यांच्या १२ पोटजातींतील गरजू नागरिकांसाठी राबविण्यात येत आहे.या समाजातील अर्जदारांचे वय १८ ते ५० वर्षांच्या दरम्यान असावे आणि त्यांनी यापूर्वी कोणत्याही शासकीय योजनेंतर्गत लाभ घेतलेला नसावा,अशी अट आहे.जिल्हा कार्यालयात सध्या अनुदान व बीजभांडवल योजना अंतर्गत कर्ज मागणी अर्ज स्वीकारण्याचे काम सुरू असून इच्छुकांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज कार्यालयीन वेळेत सादर करावेत.अर्ज करतांना जात प्रमाणपत्र,उत्पन्न प्रमाणपत्र,रेशनकार्ड,मतदान ओळखपत्र,आधारकार्ड, पॅनकार्ड,दोन पासपोर्ट आकाराचे फोटो,घरकर पावती किंवा नमुना ८,व्यवसायासंबंधी कोटेशन व प्रकल्प अहवाल,तसेच व्यवसायासंबंधी प्रशिक्षण अथवा अनुभव प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत.इच्छुक अर्जदारांनी आपले पूर्ण कर्ज प्रस्ताव साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्या., डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,आय.टी.आय.च्या मागे, एल.आय.सी. रोड, गडचिरोली येथे कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष सादर करावेत.
“गरजू समाजघटकांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबनाकडे नेण्याचा या योजनांचा हेतू असून पात्र अर्जदारांनी वेळेत अर्ज सादर करून लाभ घ्यावा,” असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक एस.बी. गौड यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ग्रामसेवकांची वर्षातून केवळ एकच संवैधानिक ग्रामसभा घेण्याची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्याच्या शिवरे दिगर येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास ग्रामसभे दरम्यान झालेल्या गोंधळ व दबावामुळे...

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!