गडचिरोली :-मेक इन गडचिरोलीच्या नावाखाली गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ.देवराव होळी यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे.या संदर्भात अनेकवेळा पोलिस विभागाकडे तक्रार करूनही दखल घेतली गेली नाही.त्यामुळे चामोर्शी तालुक्यातील काही संतप्त शेतकऱ्यांनी आमदार डॉ. होळी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा; असा आरोप करीत न्यायालयात याचिका दाखल केली आहे.या प्रकरणी न्यायालयाने राज्य सरकारची परवानगी घेण्याचे निर्देश दिले आहेत.असे वृत्त दैनिक नवराष्ट्रने प्रसारित केले आहे. आमदार होळी यांनी २०१९ मध्ये जिल्ह्यातील उद्योगांना चालना देण्यासाठी गडचिरोली मेक इन उपक्रम सुरू होता.याअंतर्गत गडचिरोली,चामोर्शी तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देऊन मत्स्य उद्योग उभारणीसाठी कर्ज मंजूर करण्यात आले.त्यामुळे श्रीनिवास दोंतुला नावाच्या व्यक्तीच्या रॉक कन्स्ट्रक्शन नावाच्या कंपनीने मध्यस्थी केली होती.मंजूर कर्जाची प्रत्येकी ८ लाख ५० हजार रुपयांची रक्कम संबंधित शेतकऱ्याच्या खात्यातून काढण्यात आली.मात्र,तेथे कोणताही उद्योग उभारला गेला नाही.आतापर्यंत सुमारे ३८ प्रस्ताव संबंधित विभागाकडे प्रलंबित आहेत.आता बँकेकडून कर्ज वसुलीसाठी संबंधित शेतकऱ्याला त्रास दिला जात असल्याने संबंधित शेतकरी बँकेत भेट घेऊन चौकशी केल्यावर ही बाब उघडकीस आली आहे.याबाबत अनेकवेळा पोलिस विभागाकडे तक्रार करूनही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे याचिकाकर्ते गंगाधर शेडमाके,गणेश वासेकर, हेमलता म्हशाखेत्री आदींनी चामोर्शी येथील प्रथम श्रेणी न्यायालयात याचिका दाखल केली.या प्रकरणी सुनावणीदरम्यान न्यायालयाने याचिका दाखल करून घेत राज्य सरकारला प्रतिवादीविरुद्ध गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले आहे.त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार होळीच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे बोलले जात आहे
शेतकरी बांधवांना चुना; ऐन निवडणुकीच्या तोंडावर आमदार होळी च्या अडचणीत होणार वाढ..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक

