- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-शेतात फासे टाकून चितळाची शिकार करून मांस शिजवून खाल्ल्या प्रकरणी वनविभागाला माहिती मिळताच वनविभाग पथकाने घटनास्थळावर धाड टाकून चार जणांना ताब्यात घेतल्याची कारवाई अहेरी तालुक्यातील वेलगूर ग्रामपंचायतस्थित बोटलाचेरू गावात केली.शंकर रामा आत्राम,किशोर मल्लेश सडमेक,मल्लेश येररा सडमेक,मुकेश कलमशाही मडावी सर्व रा.विजयपूर,ता.मुलचेरा अशी आरोपींची नावे आहेत.
माहितीनुसार,सर्व आरोपींनी बोटलाचेरू गावालगत असलेल्या शेतात चितळाला फाशात फसवून शिकार केली.चितळाचे मांस शिजवून खाल्ल्याची माहिती वनविभागाला मिळताच वनपथकाने घटनास्थळी पोहोचून चौघांना ताब्यात घेतले. वनविभाग नवेगाव क्षेत्रांतर्गत येत असलेल्या जंगल भागात चितळाचे वास्तव्य असल्याने चितळ खाद्याकरिता शेतात दाखल झाले.परंतु चितळ जाळे लावण्यात आलेल्या शेतात फसले.त्यामुळे शेतमालकाने चितळाची शिकार करून घरी नेले.त्यानंतर चितळाची भाजी बनवून खाल्ली.इतर तीन लोकांना बोलावून चितळाचे मांस त्यांना वाटप केली होती.त्यानुसार कारवाई करण्यात आली.ताब्यात घेण्यात आलेल्या चारही जणांना न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवसाची वन कोठडी ठोठावण्यात आली. ताब्यात घेण्यात आलेल्या मांसाचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. तसेच वनविभागाने घटनास्थळावर पंचनामा करून चौकशीला प्रारंभ केला.प्रकरणात आणखी किती लोक समाविष्ट आहेत; याची चौकशी सध्या सुरू आहे.
- Advertisement -

