- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :-रोपवन लागवडीच्या कामात अनियमितता तसेच वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी न पडलेल्यांची नावे दाखवून पैसे हडप करून शासकीय रकमेचा अपहार केल्याप्रकरणी एका वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यासह दोन वनक्षेत्र सहाय्यकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची घटना दोन दिवसांपूर्वी म्हणजेच शुक्रवारी गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा वनपरिक्षेत्रात उघडकीस आल्याने जिल्ह्याच्या वनविभागात एकच खळबळ माजली आहे.वनपरिक्षेत्र अधिकारी आर.जी.मून,वनक्षेत्र सहाय्यक शैलेंद्र पारधी व वनक्षेत्र सहाय्यक अब्दुल शकील अब्दुल दुरानी असे निलंबित करण्यात आलेल्या वनाधिकाऱ्यांची नावे आहेत.माहितीनुसार,गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातील वनपरिक्षेत्रात मागील वर्षाच्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर रोपवन लागवडीची कामे करण्यात आली होती.त्यातच रोपवन लागवड कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर घोळ करण्यात आला. तसेच वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात हल्ले न झालेल्यांची नावे दाखवून संगनमत करून तिघांनीही अपहार केल्याचे निष्पन्न झाल्याने वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यासह दोन वनक्षेत्र सहाय्यकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती गोंदियाचे उपवनसंरक्षक प्रमोद पंचभाई यांनी स्पष्ट केली.
- Advertisement -

