Monday, August 24, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तवैद्यकीय क्षेत्रात मोठी क्रांती; सुईमुक्त इंजेक्शनचा वापर सुरू..!

वैद्यकीय क्षेत्रात मोठी क्रांती; सुईमुक्त इंजेक्शनचा वापर सुरू..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-आजही अनेकांना इंजेक्शनची भीती वाटते. एखादा डॉक्टर ज्यावेळी इंजेक्शन देण्यासाठी जवळ येतोय,अश्यावेळी बरीचशी रुग्ण इंजेक्शन घेण्याचे टाळतात वा काहीजण ‘मेलो रे बाप’ म्हणून इंजेक्शन दिलेल्या भागावर चोळत बसतात.कारण की, इंजेक्शनने दिली जाणारी सुई ही मोठी असल्यानेच मनात भीती निर्माण होत असते.पण,आता ही भीती कायमची दूर होणार आहे; कारण,सुईमुक्त इंजेक्शन(नीडल फ्री इंजेक्शन)वैद्यकीय क्षेत्रात क्रांती घडवत आहे.नागपूर मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक तथा बालरोगतज्ज्ञ डॉ.अविनाश गावंडे यांनी लहान मुलांमध्ये सुईमुक्त म्हणजेच सुई नसलेल्या इंजेक्शनचा वापर सुरू केला असून,त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत.वैद्यकीय क्षेत्रातील हे एक महत्त्वाचे पाऊल असून,यामुळे इंजेक्शनची भीती खऱ्या अर्थाने इतिहासजमा होईल,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.डॉ.गावंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार,हे इंजेक्शन एखाद्या बंदुकीसारखे लोड केले जाते आणि हवेच्या दाबाने त्वचेमध्ये औषध सोडले जाते.यामुळे पारंपरिक इंजेक्शनप्रमाणे कोणतीही वेदना होत नाही.सर्वांत महत्त्वाचे म्हणजे,सुईमुळे होणारा टिश्यू ट्रॉमा(उतींना होणारी इजा)टाळता येतो,ज्यामुळे इंजेक्शननंतर सूज येण्याची समस्या राहत नाही.विशेष बाब म्हणजे,हे सुईमुक्त इंजेक्शन सुई असलेल्या इंजेक्शनइतकेच प्रभावी आहे.या इंजेक्शनचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे सुरक्षितता.इंजेक्शन देणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्याला चुकून सुई टोचण्याचा धोका पूर्णपणे टळतो.यामुळे एचआयव्ही आणि हिपॅटायटिस बी सारख्या गंभीर आजारांचा प्रसार होण्याची शक्यताही कमी होते. ‘नीडल फ्री इंजेक्शन’ वापरण्यास अत्यंत सोपे आहे आणि मोठ्या प्रमाणात लसीकरणात ते अत्यंत प्रभावी ठरू शकते,असे डॉ.गावंडे यांचे म्हणणे आहे.विशेषतः लहान मुलांमध्ये दिल्या जाणाऱ्या प्रतिबंधक लसीकरणात हे सुईमुक्त इंजेक्शन महत्त्वाची भूमिका बजावेल,ज्यामुळे लसीकरण अधिक सोपे आणि कमी भीतिदायक होईल.सध्या हे सुईमुक्त इंजेक्शन सहा महिने ते वृद्धांपर्यंतच्या लोकांना दिले जात आहे.सहा आठवडे ते सहा महिन्यांच्या बाळांना हे इंजेक्शन देण्यासाठी सध्या चाचण्या सुरू आहेत,ज्या लवकरच पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.हे इंजेक्शन ०.५ मिलिलिटरपर्यंत औषध देण्यासाठी वापरले जाऊ शकते.जर १ मिलिलिटर औषधाची गरज असेल,तर ते दोनदा दिले जाते.सध्या हे इंजेक्शन फक्त द्रवरूपात असलेल्या औषधांसाठी उपलब्ध आहे.हे इंजेक्शन इंट्रामस्क्युलर म्हणजे स्नायूंमध्ये आणि इंट्राडर्मल म्हणजे त्वचेच्या वरच्या थरात (एपिडर्मिसमध्ये)दिले जाऊ शकते.सध्या हे सुईमुक्त इंजेक्शन पारंपरिक इंजेक्शनपेक्षा २०० ते ३०० रुपयांनी महाग असले तरी,याचा वापर जसजसा वाढेल,तसतसा भविष्यात त्याच्या किंमती सामान्य होण्याची दाट शक्यता आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अंगावर भिंत कोसळून चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातून आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे.अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खामखुरा गावात घरासमोरील अंगणात...

माता व बालक मृत्यू प्रकरणी चौकशी समिती गठीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी येथील प्रसूती प्रकरणात माता व बालकाच्या मृत्यूची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक स्तरावर चौकशी समिती गठीत करण्यात...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयात वाणिज्य विद्यार्थी अभ्यास मंडळाची स्थापना.. – विद्यार्थ्यांनी आत्मनिर्भर बनावे- प्रा.डॉ.निलेश हलामी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डाॅ.श्रीराम गहाणे यांच्या मार्गदर्शनात शैक्षणिक सत्र २०२६-२७ करिता वाणिज्य विद्यार्थी अभ्यास मंडळाची स्थापना...

धावत्या बसमधून खाली कोसळताच दुसऱ्या बसने चिरडले; तरुणीचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-पुण्यातील सिंहगड मार्गावरील माणिकबाग परिसरात आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली. खानापूर-स्वारगेट मार्गावरील धावत्या पुणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!