Tuesday, July 28, 2026
Homeचंद्रपूरविषारी सापावर पाय पडताच केला दंश; सुरक्षारक्षकाचा मृत्यू..

विषारी सापावर पाय पडताच केला दंश; सुरक्षारक्षकाचा मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-महावितरण कंपनीच्या उपकेंद्रात सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या एका ४० वर्षीय इसमाचा विषारी सापाने दंश केल्याने मृत्यू झाल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्याच्या गोंडपिपरी तालुक्यातील वेजगाव शेत शिवारात घडली.भीमराव वसंता पेंदोर,रा.वेजगाव, ता.गोंडपिपरी असे मृत्यू झालेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे.
भीमराव पेंदोर हे विरुर येथील महावितरण कंपनीच्या कर्तव्यावरून घरी परतले होते.त्यानंतर ते शेतात गेले.
शेतातील पीक पाहणी करत असतांनाच गवतात दडून असलेल्या विषारी सापावर त्यांचा पाय पडला.पाय पडताच सापाने दंश केला.लागलीच भीमराव यांना तोहोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले.तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.उपचार सुरू असतांनाच प्रकृती जास्तच खालावल्याने भीमराव यांचा काल बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला.मृतक भीमराव हे कुटुंबातील एकमेव कमावते व्यक्ती होते.त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,एक मुलगी व आई-वडील असून कुटुंबात शोककळा पसरली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र शासनाच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत विविध जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर करण्यात आल्याने कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी...

बापरे..! तब्बल १९९ किलो गाजांची वाहतूक; दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली पोलिसांनी गांजाची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करून तब्बल १९९.५६० किलो ग्रॅम वजनाच्या गाजांची वाहतूक करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या....

महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीत १७ प्रशिक्षणार्थ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कौशल्याधारित प्रशिक्षण हे केवळ रोजगार मिळविण्याचे साधन नसून युवकांना स्वावलंबी, आत्मविश्वासू आणि उद्योगक्षम बनविण्याचे प्रभावी माध्यम आहे.उद्योगांच्या गरजेनुसार दर्जेदार प्रशिक्षण घेतल्यास...

वाघोबाची दहशत; तब्बल दहा गावात ‘हाय अलर्ट’..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या सेलू,वर्धा व इतर तालुक्यातील परिसरात तीन वर्षे वयोगटातील तरुण नर वाघोबाची भ्रमंती सुरू असल्याने तब्बल दहा गावात वन विभागाच्या वतीने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!