Wednesday, September 23, 2026
Homeमुंबईविधानसभा निवडणुकांची आचारसंहिता 'या' तारखेला होणार जाहीर...

विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता ‘या’ तारखेला होणार जाहीर…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे.सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील जागावाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात आहेत.इच्छुक उमेदवारांनीही कंबर कसली असून राजकीय ‘उड्या’ही सुरु झाल्या आहेत. अशातच विधानसभा निवडणुकांची घोषणा केव्हा होणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.त्यानुसार केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत १० ऑक्टोंबरला दुपारी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन आगामी विधानसभा निवडणुकांची घोषणा केली जाईल,अशी विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.निवडणुकांची घोषणा होताच त्या क्षणापासून राज्यात आचारसंहिता लागू होईल.
जम्मू-काश्मीर आणि हरियाणा राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल आठ तारखेला जाहीर होणार आहे.त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा मुहूर्त सुरक्षा दृष्टिकोनातून सोईस्कर होईल असे पण म्हटले जात आहे.
मागील काही दिवसांपासून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकांमधील मेगा निर्णयांचा धडाका पाहता या गोष्टींना बळ मिळत आहे.या अनुषंगाने आगामी १० ऑक्टोंबरला महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भरधाव वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने जंगल परिसरातून मार्गक्रमण करीत महामार्ग ओलांडणाऱ्या वाघिणीला जोरदार धडक दिल्याने धडकेत वाघिणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,मंगळवार २२...

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल वाजला.. -शिक्षक-पदवीधर मतदार संघात कोण मारणार बाजी?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाने जाहीर केला.त्यानुसार,तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा करण्यात...

जन सेवेतुनच खरी इश्वराची आराधना-किशन नागदेवे -साई मंदिर देवस्थान समितीच्या उपक्रमातून तब्बल २ हजार ५०० रुग्णांची मोफत तपासणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज येथील राजेंद्र  वार्डातील प्रसिद्ध साई मंदिर देवस्थान समितीच्या वतीने आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव निमित्त  मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आला.या...

‘लोकसंवाद-२०२६’मधून रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष जनजागृती कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवानिमित्त माहिती व जनसंपर्क विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद- २०२६’ उपक्रमांतर्गत आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!