- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-चित्रपट सृष्टीतील मायानगरी म्हणून मुंबईला ओळखले जाते.मुंबईतील गोरेगाव स्थित दादासाहेब फाळके नावाने सर्वात मोठी चित्रनगरी आहे.त्यानंतर हैद्राबाद या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाची फिल्मसिटी आहे.आता तिसऱ्या क्रमांकाची विदर्भातील सर्वात मोठी चित्र नगरी म्हणून नागपूर जिल्ह्यातील रामटेकजवळ फिल्म सिटी उभारली जाणार आहे.यासाठी रामटेक जवळील १२८ एकर जागा फिल्म सिटीसाठी निश्चित करण्यात आली असून ही जागा १५ दिवसात हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला जाईल,असे मंत्री आशिष शेलार यांनी म्हटले आहे.रामटेक तालुक्यातील नवरगाव येथे ही फिल्मसिटी उभारली जाणार आहे. फिल्मसिटी यशस्वी व्हावी,यासाठी एक कन्सल्टंट नेमला जाणार आहे.मुंबई फिल्मसिटी आणि रामोजी फिल्म सिटीच्या धर्तीवर विदर्भातील ही फिल्मसिटी उभारली जाणार आहे.विदर्भातील किंबहुना मध्य भारतातील पहिली तर महाराष्ट्रातील दुसरी चित्रनगरी असेल.
- Advertisement -

