- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळून लावली आहे.न्यायमूर्तिद्वय देवेंद्रकुमार उपाध्याय व नितीन सांबरे यांनी हा निर्णय दिला आहे.
परिवर्तन महाशक्ती या तिसऱ्या आघाडीमधील स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार ॲड.नारायण जांभुळे यांनी ही याचिका दाखल केली होती.जांभुळे यांनी वडेट्टीवार यांच्या प्रतिज्ञापत्रावर आक्षेप घेतला होता. वडेट्टीवार यांनी ज्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र सादर केले.तो त्यांच्या पत्नीने स्वतःच्या नावावर खरेदी केला.पत्नीच्या नावे प्रतिज्ञापत्र सादर करू शकत नाहीत.त्यामुळे त्यांचे प्रतिज्ञापत्र अवैध आहे; तसेच हा स्टॅम्प पेपर करारनाम्यासाठी खरेदी करण्यात आला आहे.मात्र,त्याचा उपयोग प्रतिज्ञा पत्रासाठी करण्यात आला.परिणामी यांचे नामनिर्देशन पत्र रद्द करण्यात यावे; अशी मागणी याचिकाकर्त्याने केली होती.त्यानुसार सुनावणी झाल्यानंतर उच्च न्यायालयाने निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करता येत नसल्याचे सांगून याचिकेची दखल घेण्यास नकार दिला.असल्याने वडेट्टीवार यांना न्यायालयाकडून एकप्रकारे दिलासा मिळाला आहे.
- Advertisement -

