Friday, June 19, 2026
Homeगोंदियावाहनाचे ब्रेक फेल; अपघातात रोजगार सेवकाचा मृत्यू..!

वाहनाचे ब्रेक फेल; अपघातात रोजगार सेवकाचा मृत्यू..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यात दुःखद घटना काल शनिवारी सकाळच्या सुमारास घडली. एकाच कुटुंबातील चार जण रासायनिक खत खरेदी करण्यासाठी जात असतांनाच वाटेत अचानकपणे वाहनाचे ब्रेक फेल झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून चारचाकी वाहन सुरक्षा भिंतीला जाऊन धडकले.यात चालक तथा रोजगारसेवकाचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना सालेकसा तालुक्यातील सालेकसा-दर्रेकसा मार्गावरील लालघाट परिसरात घडली.३२ वर्षीय सरोज सोहन कमरे रा.टेकाटोला दंडारी,ता.सालेकसा,जि.गोंदिया असे मृत रोजगारसेवकाचे नाव आहे,तर २५ वर्षीय
 मनोज मदन कमरे,१८ वर्षीय रोहित श्यामलाल कमरे  आणि १५ वर्षीय आर्यन श्यामलाल कमरे तिघेही जखमी झाले.सदरची बातमी वाऱ्यासारखी पसरताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत तात्काळ १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेस पाचारण करून जखमींना दर्रेकसा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल करण्यात आले.जखमींची प्रकृती सध्या स्थिर आहे.मात्र,चालक तथा रोजगार सेवक यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यातील टेकाटोला दंडारी येथील कमरे परिवारातील चौघेही काल शनिवारी सकाळच्या सुमारास एम एच ३५ पी ३६९३ क्रमांकाच्या टाटा सुमो वाहनाने रासायनिक खत खरेदीसाठी दर्रेकसा येथे जात होते.दरम्यान लालघाटनजीक वाहनाचे ब्रेक निकामी झाल्याने वाहन मार्गावरील घाटावर असलेल्या सुरक्षा भिंतीला जाऊन धडकले.अपघात इतका भीषण होता की,वाहनाचा समोरील भाग चक्काचूर झाला.घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागभीड तालुक्यातील गिरगाव येथे आज,शुक्रवार १९ जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.आत्माराम दसरू बोरकर...

कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच नक्षली समर्थक पोलिसांच्या तावडीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-तब्बल अकरा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा नक्षल समर्थक अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला.विशेष म्हणजे,कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच त्यास अटक करण्यात आली.त्याचा शोध...

देसाईगंजात सुगंधित तंबाखूविक्री जोमात; आरमोरीत अवैध सट्टा-पट्टी,तर कुरखेड्यात दारूचा महापूर..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात अवैध धंद्यांनी डोके वर काढले असून देसाईगंज शहर व तालुक्यात सुगंधित तंबाखूची खुलेआम विक्री,तर आरमोरी शहरापासून ते ग्रामीण...

जीएसटी नंबर मिळवून दिले नं..! आता दहा हजार द्या.. – राज्यकर निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गलेलठ्ठ पगार असतांना एकदा कां ओवर कमाईची सवय लागली रे लागली,तर मग ज्या टेबलावर कुठलेही काम मोफत जरी होत असेल तरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!