Sunday, September 13, 2026
Homeनागपूरवाळू घाटांच्या लिलाव प्रक्रियेसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे व धोरणात्मक बदल जारी..

वाळू घाटांच्या लिलाव प्रक्रियेसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे व धोरणात्मक बदल जारी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील वाळू आणि वाळू घाटांच्या लिलाव प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी तसेच अवैध उत्खननाला आळा घालण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे व धोरणात्मक जारी केली आहेत.सुधारित नियमांनुसार वाळू घाटांच्या लिलावासाठी ई-लिलावासोबत ई-निविदा पद्धतीचा अवलंब करणे बंधनकारक करण्यात आले असून तीन फेऱ्यांची प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे.याबाबतचा शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला आहे.
नव्या नियमांनुसार,पर्यावरण परवानगी मिळालेल्या नदीपात्रातील सर्व वाळूघाटांचा तालुकानिहाय एकत्र लिलाव करण्यात येणार आहे.लिलाव विहित मुदतीत पूर्ण व्हावा यासाठी बोलीच्या फेऱ्यांचे निकषही निश्चित करण्यात आले आहेत.पहिल्या फेरीत किमान ३,दुसऱ्या फेरीत किमान २,तर तिसऱ्या फेरीत किमान १ पात्र निविदाधारक असणे आवश्यक राहणार आहे. तिन्ही फेऱ्यांनंतरही लिलाव न झाल्यास संबंधित वाळू गट स्थानिक वापरासाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. यापूर्वीच्या धोरणात दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीसाठीची कालमर्यादा तसेच आवश्यक निविदाधारकांच्या संख्येबाबत स्पष्टता नव्हती.त्यामुळे विविध जिल्ह्यांमध्ये लिलावासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब केला जात होता.परिणामी,लिलाव प्रक्रियेला विलंब होऊन शासनाच्या महसुलाचे नुकसान होत असल्याचे निदर्शनास आले होते.या पार्श्वभूमीवर सुधारित नियम लागू करण्यात आले आहेत.सर्वाधिक बोली लावणाऱ्या एच-१ निविदाधारकाने विहित मुदतीत उर्वरित रक्कम भरली नाही,तर त्यानंतर एच-२ आणि एच-३ निविदाधारकांना त्याच दराने संधी देण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वाधिक बोलीदाराकडून व्यवहार पूर्ण न झाल्यास पुढील पात्र निविदाधारकांमार्फत प्रक्रिया पूर्ण करण्याचा मार्ग खुला राहणार आहे.लिलाव प्रक्रियेतील तांत्रिक तपासणीदरम्यान काही स्पर्धकांची कागदपत्रे अपूर्ण आढळल्यास त्यांना महाटेंडर पोर्टलवर आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्यासाठी एक दिवसाची अतिरिक्त मुदत देण्यात येणार आहे. त्यामुळे तांत्रिक कारणांमुळे पात्र स्पर्धक प्रक्रिया बाहेर जाण्याची शक्यता कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चुडाराम बल्हारपुरे यांच्या ‘जत्रा घडली नागोबाची’ या लोकनाट्यास सातारा येथील पुरस्कार जाहीर.. -यंदाचा सहावा पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट,डाकेवाडी(जि. सातारा)या संस्थेतर्फे दरवर्षी मराठी साहित्यिकांसाठी उत्कृष्ट वाड्.मय स्पर्धा घेण्यात येते व पुरस्कारप्राप्त साहित्यिकांना स्पंदनच्या वार्षिक साहित्य संमेलनात उत्कृष्ट...

शाळेत विद्यार्थ्यांना दिली जाणारी शारीरिक शिक्षा पॉक्सो कायद्यांतर्गत लैंगिक गुन्ह्याच्या श्रेणीत येत नाही-सर्वोच्च न्यायालय -शिक्षकावरील संपूर्ण खटला रद्द..

उद्रेक न्युज वृत्त :-शाळेत शिक्षकाने दोन विद्यार्थिनींना दिलेल्या शिक्षेवरून शिक्षकाविरोधात नोंदवण्यात आलेला गुन्हेगारी खटला सर्वोच्च न्यायालयाने पूर्णपणे रद्द करून शाळेत विद्यार्थ्यांना दिली जाणारी शारीरिक...

आपसी समझोत्याने ४६१ प्रकरणे निकाली; तब्बल ४ कोटी १६ लाखांहून अधिकच्या रकमेवर तडजोड..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार गडचिरोली जिल्हा न्यायालय तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये शनिवार १२...

कर्जमुक्ती योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील यादी गावपातळीवर प्रसिद्ध.. – गडचिरोली जिल्ह्यातील आतापर्यंत ४ हजार ३७१ शेतकऱ्यांच्या खात्यात २५ कोटी रुपये जमा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६’च्या दुसऱ्या टप्प्यात गडचिरोली जिल्ह्यातील ३ हजार ६१० शेतकरी पात्र ठरले आहेत.पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!