Friday, September 11, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तवादळी वाऱ्यासह बरसणार पाऊस; तब्बल बारा जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा..

वादळी वाऱ्यासह बरसणार पाऊस; तब्बल बारा जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-पावसाचा जोर कमी झाला असला तरीही राज्यातील काही भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडत असल्याचे चित्र आहे.गेल्या काही दिवसांत राज्यातील अनेक भागात मोठा पाऊस पडल्याने नदी,नाले दुथडी भरुन वाहू लागले होते.त्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.अशातच आता पुन्हा राज्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.पुढील दोन ते तीन दिवस राज्यात वादळी पाऊस कोसळणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.हवामान विभागाने दिलेल्या इशारानुसार,चंद्रपूर,गडचिरोली,गोंदिया,नागपूर, बीड,हिंगोली,यवतमाळ,परभणी,छत्रपती संभाजीनगर, नांदेड,लातूर आणि धाराशिव या बारा जिल्ह्यांना पावसाच्या सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.या भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.अश्यातच कोकणातील जिल्ह्यांमध्ये देखील तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ,सोसाट्याचा वारा (३०ते ४० किमी प्रतितास वेग) आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.मध्य महाराष्ट्र,मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ,सोसाट्याचा वारा (४० ते ५० किमी प्रतितास वेग)आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.त्यामुळे विजांचे कडकडाट व सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह पावसापासून बचाव करण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विवाहाचे प्रमाणपत्र देण्यासाठी मागितले दोन हजार; लीपिकास ऑफिसमध्येच पकडले एसीबीने..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-विवाहाचे प्रमाणपत्र देण्यासाठी आरोग्य खात्यातील लीपिकाने शासकीय फी व्यतिरिक्त अतिरिक्त लाचेच्या रकमेची मागणी केल्याप्रकरणी मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या(ACB) पथकाने सापळा...

ऐन सणाच्या दिवशीच दुर्दैवी घटना..! आयशर ट्रक आणि ट्रॅक्सचा भीषण अपघात; आठ जणांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-ऐन तान्हा पोळा सणाच्या दिवशीच भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे.आज,शुक्रवार ११ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास...

माता व नवजात बालिकेचे प्राण वाचविण्यात वैद्यकीय पथकाला यश.. – मातामृत्यू कमी करण्यासाठी वेळेवर नोंदणी व उपचार घेण्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील हेडरी येथील कालीअम्मल हॉस्पिटल येथे अतिजोखमीच्या गर्भधारणेतील अत्यंत गंभीर व गुंतागुंतीच्या प्रकरणात वेळेवर निदान,रक्तघटकांचा पुरवठा,आवश्यक उपचार व तातडीची...

धरणात बुडालेल्या तरुण शेतकऱ्याचा सापडला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बैल पोळा सणाच्या एक दिवसापूर्वी धरण परिसरात बैल धुण्यासाठी गेलेला तरुण शेतकरी बुडाल्याची घटना काल,बुधवार ९ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!