Tuesday, July 21, 2026
Homeचंद्रपूरवाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार..!

वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-गुरे चराईसाठी जंगल परिसरात गेलेल्या एका गुराख्यास वाघाने हल्ला चढवून ठार केल्याची घटना आज,शनिवार २९ नोव्हेंबर रोजी दुपारी चारच्या सुमारास चंद्रपूर वनपरिक्षेत्रातील चिचपल्ली वनपरिक्षेत्र कार्यालय हद्दीत येणाऱ्या मंदातुकुम परिसरातील महादवाडी जंगल परिसरात घडली.रमेश नागो बोमनवार वय ५५ वर्षे, रा.मंदातुकूम असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या गुराख्याचे नाव आहे.
गुराखी रमेश बोमनवार हे नेहमीप्रमाणे आज शनिवारी गुरे चारण्यासाठी जंगल परिसरात गेले होते.गुरे चरत असतांनाच दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानकपणे हल्ला चढवला.यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.सदरची घटना चंद्रपूर वनपरिक्षेत्रातील चिचपल्ली वनपरिक्षेत्र कार्यालय हद्दीत येणाऱ्या कक्ष क्रमांक-६९६ मध्ये घडली.घटनेची माहिती स्थानिक नागरिकांकडून मिळताच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.मृतदेह ताब्यात घेत पुढील प्रक्रिया पार पाडणे सुरू होते.आतापर्यंत वाघाच्या हल्ल्यात ३७,बिबटच्या हल्ल्यात दोन,हत्तीच्या हल्ल्यात एक व अस्वलाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून चालू वर्षातील वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील हि ४१ वी घटना आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम; शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन.. -प्रत्यक्ष खताच्या गोणीवरील छापील किंमत पाहूनच खत खरेदी करावे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाल्याने राज्यासह गडचिरोली जिल्ह्यातही डीएपी खताचा पुरवठा अपेक्षेप्रमाणे होत नसल्याने शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा...

नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन..पुढील चोवीस तास महत्वाचे; चार जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे चित्र आहे. हवामान विभागाने नुकतेच १९ जुलै ते २३ जुलै दरम्यान पाच दिवसांसाठी जोरदार...

ग्रामपंचायतींच्या जन सुविधा निधीत मोठी वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील ग्रामीण भागाचा विकास करतो म्हटले तर निधीचा अभाव,त्यातच निधीची कमतरता यामुळे स्थानिक पातळीवरील पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करणे अशक्य होते.यासाठी ग्रामीण...

शेतकऱ्यांना हलक्यात घेऊन त्यांच्याशी राजकीय डावपेच खेळाल तर पेचात पडाल- आमदार रोहित पवार

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या स्थितीत शेतकरी कर्जमाफी बाबत संभ्रम निर्माण झाला आहे.सरकारकडून नुसत्या तारखा देण्यात येत असल्याने शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!